esakal | हेल्दी रेसिपी : चिबुडाचे सॅलड
sakal

बोलून बातमी शोधा

Chibud

चिबूड किंवा चिबड हे टरबूजवर्गातीलच एक फळ; जे कोकण, गोवा भागामध्ये साधारण भाद्रपद महिन्यापासून पुढे नवरात्रीपर्यंत मिळते. या फळाला गणेशोत्सवात मोठे स्थान. इतर फळांप्रमाणे गणपतीच्या आरासीमध्ये चिबूडचा समावेश असतो. शिवाय, नवरात्रीच्या उपवासातदेखील काही ठिकाणी चिबूड खाल्ला जातो. चिबुडाला साधारण गोडसर चव असते.

हेल्दी रेसिपी : चिबुडाचे सॅलड

sakal_logo
By
शिल्पा परांडेकर

चिबूड किंवा चिबड हे टरबूजवर्गातीलच एक फळ; जे कोकण, गोवा भागामध्ये साधारण भाद्रपद महिन्यापासून पुढे नवरात्रीपर्यंत मिळते. या फळाला गणेशोत्सवात मोठे स्थान. इतर फळांप्रमाणे गणपतीच्या आरासीमध्ये चिबूडचा समावेश असतो. शिवाय, नवरात्रीच्या उपवासातदेखील काही ठिकाणी चिबूड खाल्ला जातो. चिबुडाला साधारण गोडसर चव असते. त्यामुळे फोडींवर थोडी साखर घालून खाल्ल्यास किंवा चिबूड, तांदूळ रवा आणि गूळ वापरून केलेले चिबुडाचे पारंपरिक वडे असोत किंवा नारळाचे दूध, गूळ, वेलची पूड व पोहे घालून केलेले चिबुडाचे रसायन, हे सर्वच पदार्थ अगदी अप्रतिम!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चिबुडामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. रुचकर, रक्तपित्तनाशक, मलमूत्र साफ होण्यासाठी चिबूड गुणकारी आहे. तेव्हा या ऋतूंतील हा पारंपरिक पदार्थ थोड्या वेगळ्या पद्धतीने सॅलड किंवा डेझर्ट म्हणूनही करून पाहता येईल.

साहित्य
चिबूड, मध, काजू-अक्रोडचे तुकडे, नारळाचे घट्ट दूध, किंचित मीठ, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स (ऐच्छिक)

कृती
१. साल व बिया काढून चिबुडाच्या चौकोनी फोडी करून घ्याव्यात. (फोडींना पाणी सुटल्यास पाणी काढून घेणे.)
२. उर्वरित साहित्य एका वेगळ्या भांड्यात सॅलडच्या ड्रेसिंगप्रमाणे एकत्रित करावे.
३. खातेवेळी वरून घालून खावे.

(टीप - चिबुडाच्या सालीचा हिरवा गर व फोडींचे पाणी टाकून न देता त्यांचा वापर थालीपिठे, पराठे, डाळ किंवा सूप यांमध्ये करता येईल.)

Edited By - Prashant Patil