हेल्दी रेसिपी : कोरफडीची भाजी

शिल्पा परांडेकर
Tuesday, 3 November 2020

कोरफड साधारणपणे आपल्या प्रत्येकाच्या घरी असते. स्त्रियांच्या आरोग्यासाठी, केसांसाठी, त्वचेसाठी कोरफड उपयुक्त असते, हे आपण जाणतोच. कोरफड पोटात घेण्याचे देखील अनेक फायदे आहेत. गर, रस किंवा भाजी स्वरूपात कोरफडीचा आहारात समावेश करता येऊ शकतो.

कोरफड साधारणपणे आपल्या प्रत्येकाच्या घरी असते. स्त्रियांच्या आरोग्यासाठी, केसांसाठी, त्वचेसाठी कोरफड उपयुक्त असते, हे आपण जाणतोच. कोरफड पोटात घेण्याचे देखील अनेक फायदे आहेत. गर, रस किंवा भाजी स्वरूपात कोरफडीचा आहारात समावेश करता येऊ शकतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी१’, ‘बी२’, बी३’, ‘बी४’, फोलिक ॲसिड, मॅग्नेशिअम, झिंक, लोह, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि सेलेनिअम, असे अनेक उपयुक्त घटक असतात. वजन घटविणे, शरीर डिटॉक्स करण्यासाठी, अपचन, पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी कोरफड कामी येते.
कोरफडीची ही उपयुक्तता आपल्या जुन्या पिढीने अगदी अचूक जाणली असावी; म्हणूनच कोरफडीचा असा नावीन्यपूर्ण पद्धतीने त्यांनी आहारात समावेश केला. पूर्वी कोरफडीच्या गरांसोबतच त्याला फुटणारे तुरे देखील खात असत.

पद्धत - 1
साहित्य

कोरफडीचे गर, तिखट, मीठ, जिरे-मोहरी, कोथिंबीर, थोडेसे तांदळाचे पीठ (गर घोळविण्यासाठी).

कृती 

  • कोरफड कापलेल्या बाजूकडून पिवळा द्रव बाहेर येत असल्यास तो पूर्णपणे बाहेर येऊ देणे व नंतर कोरफडीच्या पातीच्या कडा कापून पाती स्वच्छ धुऊन घेणे.
  • गर बारीक कापून फोडी पिठात घोळवून घेणे. (पूर्वी गर चुलीच्या राखेत घोळवत. चुलीतील राख मिळाल्यास उत्तम).
  • फोडणी करून गर घालून भाजी परतणे.
  • पाणी न घालता एक वाफ आणावी.
  • कोथिंबीर घालून सजविणे.

पद्धत - 2
साहित्य

कोरफडीचे गर, तिखट, मीठ, जिरे-मोहरी, बारीक चिरलेला कांदा, कोणतीही भिजवलेली डाळ.

कृती 

  • वरीलप्रमाणे कोरफडीचे गर कापून शिजवून घेणे.
  • फोडणी करून कांदा, डाळ घालून परतणे.
  • शिजवलेल्या कोरफडीच्या फोडी, तिखट, मीठ घालून वाफेवर शिजवणे.
  • कोथिंबीर घालून सजविणे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shilpa parandekar on healthy recipe