esakal | हेल्दी रेसिपी : कळण्याच्या भाकरी
sakal

बोलून बातमी शोधा

Kalnyachya-Bhakri

आपण मागील लेखात कळण्याचे फुनके ही रेसिपी पाहिली होती आणि मागेच ठरविल्याप्रमाणे आज आपण कळण्याच्या भाकरीविषयी जाणून घेणार आहोत. स्थानिक परिस्थिती, पिके व ऋतुमानानुसार महाराष्ट्रात भाकरीचे अनेकविध प्रकार पाहायला मिळतात. ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ हे आपणास माहीत असणारे नेहमीचे प्रकार. याशिवाय मका, वरई, उडदाची, मिसळीची, कळण्याची हे इतर काही प्रकार. दुष्काळाच्या काळात तर लोकांनी आंबाडी, कोंड्याची किंवा बरबटीची भाकरी खाऊन गुजराण केली होती.

हेल्दी रेसिपी : कळण्याच्या भाकरी

sakal_logo
By
शिल्पा परांडेकर

आपण मागील लेखात कळण्याचे फुनके ही रेसिपी पाहिली होती आणि मागेच ठरविल्याप्रमाणे आज आपण कळण्याच्या भाकरीविषयी जाणून घेणार आहोत. स्थानिक परिस्थिती, पिके व ऋतुमानानुसार महाराष्ट्रात भाकरीचे अनेकविध प्रकार पाहायला मिळतात. ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ हे आपणास माहीत असणारे नेहमीचे प्रकार. याशिवाय मका, वरई, उडदाची, मिसळीची, कळण्याची हे इतर काही प्रकार. दुष्काळाच्या काळात तर लोकांनी आंबाडी, कोंड्याची किंवा बरबटीची भाकरी खाऊन गुजराण केली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काही वर्षांपूर्वी भाकरी हे ग्रामीण किंवा गोरगरिबांचे अन्न असा (उगाचच) समज होता, मात्र आता भाकरीने ‘हेल्दी डाएट फूड’ म्हणून मान मिळवला आहे. भाकरीला सुगीचे दिवस आले आणि ती सर्वांच्याच ताटात विराजमान झाली.

मला आठवते, काही वर्षांपूर्वी माझ्या भावाला जीममध्ये एक ‘डाएट प्लान’ दिला व त्यात सांगितल्याप्रमाणे विविध धान्ये, कडधान्ये व डाळी यांची संमिश्र भाकरी आहारात घेण्याचे सुचविले होते. त्याचे पाहून मीही अशी भाकरी खायला सुरुवात केली होती! परंतु पुढे माझ्या या प्रवासात असे लक्षात आले की, हा एक नवीन ‘डाएट फॅड’ रूजवला जात आहे. प्रत्यक्षात ही आपली पारंपरिक ‘मिसळीची भाकरी’च आहे, म्हणजे सध्याच्या डाएटच्या भाषेत ‘मल्टीग्रेन रोटी’.

भाकरी पचायला हलकी असते. मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, अपचन अशा समस्या असणाऱ्यांसाठी भाकरी गुणकारी आहे. कोलेस्ट्रोल कमी करणे, वजन घटविणे याकरिताही भाकरीचा आहारात आवर्जून समावेश करावा.

मिसळीच्या किंवा कळण्याच्या भाकरीमध्ये ज्वारीसोबातच डाळींचा समावेश असल्यामुळे तंतुमय घटकांसोबत प्रथिनेदेखील मिळतात. त्यामुळे एक ‘कंप्लिट मिल’ म्हणूनही या भाकरीचा विचार करता येईल.

कळण्याची भाकरी - प्रकार १
साहित्य - ज्वारी १ किलो, उडीद डाळ किंवा अख्खे उडीद पाव किलो किंवा आवडीप्रमाणे, धणे, मेथी दाणे.
कृती - सर्व साहित्य एकत्रित दळणे व नेहमीप्रमाणे भाकरी करणे.

प्रकार २
ज्वारीसोबत कोणत्याही डाळीचा कळणा व बाकी साहित्य वरीलप्रमाणे एकत्रित दळणे व नेहमीप्रमाणे भाकरी करणे.

मिसळीची भाकरी -
साहित्य -
मूग, चणे, सोयाबीन प्रत्येकी १ वाटी, उडीद अर्धा वाटी, ज्वारी व गहू प्रत्येकी १ ग्लास.

कृती - सर्व साहित्य एकत्रित दळणे व नेहमीप्रमाणे भाकरी करणे.

टीप - मूग, चणे व उडीद डाळीचा कळणा मिळाल्यास त्याचा वापर करावा.
या भाकरीसाठी साहित्य व त्याचे प्रमाण आवडीनुसार बदलता येईल.

Edited By - Prashant Patil