किचन + : वॉटरमेलन कटर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 March 2020

वैशिष्ट्ये

  • हाताळण्यास अत्यंत सोपा.
  • वेगाने आणि आकर्षक आकारात टरबूज कापणे शक्य.
  • पूर्णपणे स्टेनलेस स्टीलची बॉडी. 
  • टरबूज कापण्याचा वेळ निम्म्यावर आणतो. 
  • टरबूज कापणे व कापलेला भाग बाहेर काढणे अत्यंत सोपे. 
  • साफ करणे सहज शक्य.

आरोग्य उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत आणि टरबुजांचा (वॉटरमेलन) सीझनही सुरू झाला आहे. उन्हातून आल्यावर तोंडात टाकलेली टरबुजाची एक फोड तुम्हाला छान गारवा देऊन जाते व त्याचबरोबर शरीरातील पाण्याची कमतरताही भरून काढते. टरबुजाचे आरोग्याच्या दृष्टीने इतरही अनेक फायदे आहेत, मात्र टरबूज कापणे आणि त्यानंतर त्याच्या हव्या तशा फोडी बनविणे हे तसे कटकटीचे आणि कष्टाचे काम.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

टरबूज कमीत कमी कष्टांत आणि वेळेत कापण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची उपकरणे उपलब्ध आहेत. त्यातील स्टेनलेस स्टीलचा एक कटर तुमच्या नक्कीच उपयोगी पडू शकेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article on watermelon cutter