esakal | भारतीय पोषण खजिना : पोषक बाजरी
sakal

बोलून बातमी शोधा

Bajari

हिवाळ्यात असे पदार्थ खा, जे तुम्हाला उत्साही ठेवतील आणि तुमच्या शरीराचं तापमान नियंत्रित ठेवतील. हिवाळ्यात आपल्याला जास्त भूक लागते - त्यामुळे असे पदार्थ खाल्ल्यानं आपल्या शरीराचं इंजिन छान पद्धतीनं काम करायला मदत होते. 

भारतीय पोषण खजिना : पोषक बाजरी

sakal_logo
By
डॉ. मनीषा बंदिष्टी

हिवाळ्यात असे पदार्थ खा, जे तुम्हाला उत्साही ठेवतील आणि तुमच्या शरीराचं तापमान नियंत्रित ठेवतील. हिवाळ्यात आपल्याला जास्त भूक लागते - त्यामुळे असे पदार्थ खाल्ल्यानं आपल्या शरीराचं इंजिन छान पद्धतीनं काम करायला मदत होते. 

बाजरीचे पदार्थ हिवाळ्यात जास्त खाल्ले जात असले, तरी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अजूनही तिचा रोजच्या खाण्यात समावेश असतो. पोट भरल्याची किंवा भूक भागल्याची जाणीव बाजरीमुळे जास्त वेगानं होते आणि तिच्यामुळे मिळालेली ऊर्जा तुलनेनं जास्त काळ पुरते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महत्वाचे पोषक घटक आणि फायदे

 • बाजरीमध्ये जास्त प्रमाणात पोटॅशियम असते- जे तिच्यातले औषधी गुणधर्म वाढवतात. 
 • बाजरीत तंतुमय पदार्थ खूप असतात- ज्यामुळे तुमच्या रक्तातलं बॅड कोलेस्टेरॉल कमी होण्यास खूप मदत करतात. 
 • पचनसंस्थेतल्या हालचाली नियमित होण्यासाठी आणि पचन चांगलं होण्यासाठी बाजरी मदत करते. 
 • बाजरी तुमच्या शरीराला डिटॉक्सिफाय करते. तिच्यात अँटी-ऑक्सिडंट्स असतात. 
 • बाजरीमध्ये व्हिटॅमिन ‘बी’ भरपूर असते. 
 • बाजरीमध्ये आयर्न, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, मँगेनीज, कॉपर, झिंक आणि सेलेनियम इत्यादी खनिजं असतात-त्यामुळं तिचं पोषणमूल्य उच्च असतं. या खनिजांमुळं तुमच्या शरीरातले कार्बोहायड्रेट्स आणि फॅट कमी व्हायलाw  मदत होते. 
 • बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो-त्यामुळं ती मधुमेहासाठी चांगली मानली जाते. 
 • बाजरीमध्ये मॅग्नेशिअम चांगलं असल्यामुळं ती हृदयासाठीही चांगली असते. 
 • बाजरीत झिंक असल्यानं ती त्वचेची स्थिती सुधारते आणि वार्धक्याच्या खुणा कमी करते. 

रेसिपी
बाजरी आणि मूग डाळ खिचडी 

साहित्य - अर्धा कप बाजरी (आठ तास भिजवून पाणी काढून घेतलेली), अर्धा कप मूग डाळ (धुतलेली आणि पाणी काढून घेतलेली), दोन टेबलस्पून तूप, चवीपुरतं मीठ, एक टेबलस्पून जिरे, एक चिमूट हिंग, पाव टेबलस्पून हळद. याचबरोबर गार्निशिंगसाठी ओनियन रिंग्ज, कोथिंबीर. 

कृती 

 • बाजरी आणि मूग डाळ खिचडीसाठी बाजरी, मूग डाळ, मीठ आणि दोन कप पाणी प्रेशर कुकरमध्ये घाला. ते व्यवस्थित मिक्स करा आणि चार शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. 
 • झाकण उघडण्यापूर्वी वाफ बाहेर गेली असेल याची खात्री करून घ्या. 
 • एका छोट्या नॉन-स्टिक पॅनमध्ये तूप गरम करा आणि त्यात जिरे घाला. 
 • जिरे तडतडायला लागले, की हिंग, हळद घाला आणि काही सेकंद ते तसेच ठेवा. 
 • ही फोडणी खिचडीत घाला. ती व्यवस्थित मिसळून घ्या आणि सतत हलवत मंद आचेवर दोन ते तीन मिनिटे शिजू द्या. 
 • बाजरी आणि मूग डाळीची ही खिचडी लगेच गरमगरम खावी.

Edited By - Prashant Patil

loading image