
Ashadhi Ekadashi upvas recipe ideas: आषाढी एकादशी हा पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईच्या भक्तीचा आणि उपवासाचा पवित्र सण आहे. यंदा 6 जुलै 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी अनेक भाविक उपवास करतात. यंदा एकादशीला उपवासात चविष्ट आणि सात्त्विक पदार्थ बनवण्याची असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. उपवासात खाल्ले जाणारे पदार्थ पौष्टिक आणि सोपे असावेत असे प्रत्येकाला वाटते. आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तात, विठ्ठल भक्ती आणि उपवासाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तुम्ही उपवासाचे आलू पराठे तयार करु शकता. चला तर मग जाणून घेऊया उपवासाचे आलू पराठे बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.