दादरच्या मराठमोळ्या माणसामुळे लागला वडापावचा शोध; जाणून घ्या इतिहास

Vada_Pav
Vada_Pav
Updated on

मुंबई या मायानगरीचं नाव जरी घेतलं तरीदेखील अनेक गोष्टी धडाधड डोळ्यासमोर उभ्या राहतात. यातलीच एक गोष्ट म्हणजे मुंबईचा फेमस वडापाव. मुंबई आणि मुंबईचा वडापाव या दोघांचं नात काही औरच आहे. केवळ मुंबईकरच नव्हे तर या वडापावची भूरळ पार विदेशी नागरिकांनादेखील आहे. त्यामुळे विदेशातदेखील वडापावची तुफान क्रेझ पाहायला मिळते. बटाट्याची भाजी आणि बेसन पीठापासून तयार केलेल्या पारंपरिक वडापावची जागा आता वेगवेगळ्या चवीच्या आणि फ्लेवरच्या वडापावने घेतली आहे. त्यामुळे चीझ वडापाव, ग्रील वडापाव, जम्बो वडापाव असे अनेक वडापावचे प्रकार खवय्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत. मात्र, जो ओरिजनल वडापाव आहे त्याची चव विसरणं कोणालाही शक्य नाही. खरंतर वडापाव हा पदार्थ लोक चवीने आणि तितक्याच आवडीने खातात मात्र, या वडापावचा नेमका शोध कसा लागला किंवा कोणत्या व्यक्तीच्या डोक्यात वडापाव तयार करण्याची पहिली कल्पना आली हे फार कमी जणांना माहित असेल. त्यामुळेच वडापावचा शोध लावणाऱ्या एका व्यक्तीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. वडापावचा शोध हा एका मुंबईकराने लावला असून आज वडापावला जागतिक ओळख मिळाली आहे.

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडणाऱ्या वडापावचा शोध एका मराठमोळ्या आणि विशेष म्हणजे एका मुंबईकराने लावला आहे. खरंतर या वडापावच्या शोधाची कहानी अत्यंत रंजक आहे.  बटाट्याची भाजी आणि बेसनाचा घोळ तयार करुन केलेला गरमागरम वडापाव पाहिला की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं त्यामुळेच या वडापावचा इतिहास नक्कीच जाणून घेतला पाहिजे.

दादरमधील अशोक वैद्य यांनी पहिला वडापाव तयार केला आणि पाहता पाहता त्याची लोकप्रियता सातासमुद्रापार पोहोचली. १९६६ मध्ये अशोक वैद्य यांनी त्यांच्या खाद्यपदार्थांच्या गाडीवर वडापाव ही नवीन डिश तयार केली असं म्हटलं जातं. तर काहींच्या मते, दादरमधील सुधाकर म्हात्रे यांनीदेखील याच काळात वडापाव करण्यास सुरुवात केली.

१९७० ते  १९८० च्या दशकात महाराष्ट्रातील अनेक मिल बंद पडल्या होत्या. त्यामुळे अनेक मिल कामगारांनी उदरनिर्वाह करण्यासाठी लहान लहान खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरु केले होते. यात अनिल वैद्य यांनी वडापावचा व्यवसाय सुरु केल्याचं म्हटलं जातं.

कशी मिळाली वडापावची आयडिया?

धकाधकीच्या जीवनात अशोक वैद्य यांनी अनेक जणांना धावपळ करताना पाहिलं होतं. मात्र, वेळ आणि पैशाच्या अभावामुळे पोटात भूक असतानादेखील या चाकरमान्यांना पुरेसं जेवण मिळत नव्हतं. त्यामुळेच कमी पैशात पोट भरेल असा पदार्थ तयार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि वडापावचा शोध लागला.

वडापाव आधारित आहे डॉक्युमेंट्री
अशोक वैद्य यांच्या वडापावच्या कथेवर एक डॉक्युमेंट्रीदेखील तयार करण्यात आली आहे. २०१५ मध्ये एका पत्रकाराने यावर आधारित ही डॉक्युमेंट्री तयार केल्याचं म्हटलं जातं.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com