Badam Halwa Recipe: भाऊबीजेला करा टेस्टी बदामाचा शिरा, पहा सोपी रेसिपी

बदामाचा हलवा कसा करायचा? जाणून घ्या रेसिपी
Badam Halwa Recipe
Badam Halwa Recipesakal

दिवाळी हा वर्षातला सर्वात मोठा सण आहे. दिवाळीचा प्रत्येक दिवस खूप खास असावा, असे प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी दर दिवशी काहीतरी खमंग खाण्याच्या मेजवाणीचे आयोजन केले जाते. आज आम्ही तुम्हाला बदामाचा हलवा कसा करायचा, याविषयी सांगणार आहोत. (Badam Halwa Recipe)

चला तर जाणून घेऊया टेस्टी बदामाचा हलवा रेसिपी --

साहित्य -

  • तूप

  • बदाम

  • साखर

  • वेलची पावडर

  • पानी

Badam Halwa Recipe
Diwali Recipes : दिवाळीनिमित्त पारंपारिक पद्धतीने बनवा रंगीत कानवले

कृती -

  • सुरवातीला बदाम ६-७ तास पाण्यात भिजू घाला त्यानंतर बदामाचे सालटे काढून घ्या

  • कमी पाण्यात हे बदाम मिक्सरमध्ये बारीक करा.

  • गॅसवर गरम तुपात मिक्समधून काढलेल्या बदामाची पेस्ट खमंग भाजून घ्या. त्यात थोडे पानी टाका आणि सारखे हलवत रहा.

  • पाणी आटायला गेल्यावर त्यात थोडी साखर टाकावी

  • नंतर गॅस बंद करुन वेलची पावडर वरुन टाकावी.

  • खमंग आणि टेस्टी बदामाचा हलवा तयार होणार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com