Video : फूडहंट : बाओबाब मल्टी क्युझीन ग्लोबल रेस्टॉरंट

नेहा मुळे
Saturday, 25 January 2020

पुण्यामधील पहिल्या कापड गिरण्यांपैकी एक असलेल्या राजा बहादूर मिल्स परिसराच्या नूतनीकरणानंतर चकाचक झालेल्या ‘द मिल्स’च्या परिसरात आल्यावर ‘बाओबाब’चा एलईडी बोर्ड तुमचे लक्ष वेधतो. लहानपणी ‘द लिटिल प्रिन्स’ ही प्रसिद्ध कादंबरी वाचलेल्यांना बाओबाबची ओळख नक्कीच असेल. खरेतर बाओबाब एका झाडाचे नाव. आफ्रिकेतल्या मादागास्करचे हे राष्ट्रीय झाड. भारतात अवध आणि सिंध प्रांतात ही झाडे आढळतात. या आणि अशाच देश-प्रदेशात प्रचलित आणि प्रसिद्ध असलेल्या डिशेसनी बाओबाबचा मेन्यू सजलेला दिसतो. बाओबाब आढळणाऱ्या देशांमधील डिशेस हीच बाओबाब या रेस्टॉरंटची मूळ संकल्पना आहे.

बाओबाबचा मेन्यू अतिशय परिपूर्ण असून, तो उत्तमप्रकारे क्युरेटदेखील केलेला आहे. दर्जेदार पदार्थांमुळे केवळ १० महिन्यांतच बाओबाब ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे.

झोमॅटोच्या ‘बेस्ट ओपनिंग्स ऑफ २०१९’मध्ये बाओबाबचा समावेश झाला आहे. अनेक पाकशैलींचा समावेश असलेल्या व वैश्‍विक फूड मिळणाऱ्या या रेस्टॉरंटमधल्या सगळ्या डिशेसबद्दल लिहिणे शक्य नसले, तरी काही विशेष डिशेस खालीलप्रमाणे -
आफ्रिकेच्या सिएरा लेओनचे प्रसिद्ध सूप ‘एब्बेह’ची चव पुण्यात दुसरीकडे क्वचितच मिळेल. इथे मिळणाऱ्या कॅण्टोनीज तिखट, आंबट सूपची चवही चाखण्यासारखी आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

थंडीमध्ये मजा येते ती म्हणजे सौम्य तिखट, चविष्ट, वाफाळलेल्या डिमसम्स आणि बाओजची (स्टीम्ड बन्स). अँपेटायझर्समध्ये अनेक ओरिएंटल आणि तंदूर प्रकार आहेत. ‘कुंभ की गलौटी’ हा मशरूमयुक्त व्हेज कबाब नक्की ट्राय करावा. मटण गलौटी हा तितकाच सुंदर. ‘लो बाक गो’ही एक वेगळीच मुळा आणि मशरूमची चिनी डिश. ही डिश चिनी नववर्ष साजरे करताना खाल्ली जाते. सिंधी दाल पक्वान आणि अवधी टिक्कीनेही येथे जेवणाची सुरुवात करता येते.

सॅलड्स आणि मेन कोर्समध्ये निरनिराळ्या डिशेस पाहून तर ‘स्पॉईल्ट फॉर चॉइस’ होते. ब्लॅक चिकन इन वाईन सॉस येथील प्रख्यात डिश. श्रीलंकेची अंबुल पोलोस करी म्हणजे फणसाची आंबट तिखट डिश असो किंवा मोरक्कन व्हेजिटेबल टॅगिन ही माघरेबी अशा त्या त्या देशांत प्रसिद्ध असलेल्या डिशेस चव येथे चाखायला मिळेल. या सोबतच अनेक इतर आफ्रिकन, कोरियन, जपानी, थाय, मलेशियन, सिंगापोरिअन, ग्रीक, ऑस्ट्रेलियन डिशेसही येथे उपलब्ध आहेत. सोबत पास्ता आणि पिझ्झा आहेतच. डेझर्टसमध्ये इंटेन्स चॉकलेटची चव अनुभवायलाच हवी.

पदार्थांची नावे अनोळखी असली, तरी ‘बाओबाब’मधील पदार्थांचा आस्वाद घेण्यात कोणतीही भीती बाळगू नका! इथला स्टाफ अतिशय फ्रेंडली आणि तत्पर आहे. सर्व डिशेसची वैशिष्ट्ये समजावून ते पदार्थ निवडण्यासाठी मदत करतात. ‘बाओबाब’चा परिसर आणि माहौलही उल्लेखनीय आहे. येथे आरामदायी ओपन (अल फ्रेस्को) आणि इनडोअर सीटिंगची सोय उपलब्ध आहे. एकदा आवर्जून भेट द्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: baobab multi causing global restaurant