esakal | Paneer Special : बंगाली दाई रेसिपी, नक्की ट्राय करा
sakal

बोलून बातमी शोधा

Paneer Special : बंगाली दाई रेसिपी, नक्की ट्राय करा

Paneer Special : बंगाली दाई रेसिपी, नक्की ट्राय करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पनीर हे साधारणतः सर्वांना आवडतं. अधिकतर लोक याला जास्त पसंती देतात. कोणत्या वेळी काही स्पेशल खाण्याची चव आली असेल तर आपण पनीर पासून बनवलेले विविध पदार्थ खातो. जर तुम्ही एक्स्ट्रा पनीर लव्हर असाल तर तुम्ही पनी पासून बनलेल्या विविध रेसिपीचे चाहते असता. परंतु तुम्ही बंगाली स्पेशल दाई पनीर कधी ट्राय केला आहे का? जर तुम्ही हा शब्द पहिल्यांदा ऐकला असेल तर तुम्ही ही डीश नक्की ट्राय करुन पहा. दाई पनीर ही पनीरची युनिक डीश आहे. ज्याला काही मसाला सोबत शिजवले जाते. ही रेसिपी आपण आज पाहणार आहोत.

बनवण्याची पद्धत

सुरुवातीला पनीर स्वच्छ धुऊन घ्या आणि त्याला क्यूब्स मध्ये कट करून घ्या. त्यावर थोडे मीठ आणि काळी मिरची शिंपडा. एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या आणि हे त्यावरत मंद आचेवर हलका ब्राऊन होईपर्यंत हे पनीर क्यूब्स तळून घ्या. टोमॅटो, आलं चिरून घ्या आणि एका बाजूला ठेवा. मिक्सरचे भांड्यात थोडे पाणी घालून यामध्ये एक चुटकी मीठ, हळद पावडर घाला. आता एका पॅनमध्ये तूप गरम करा त्यामध्ये साबुत लाल मिरची फ्राय करा. सोबत टोमॅटो पेस्ट घाला. यामध्ये मीठ घालून मिश्रण शिजवून घ्या. त्यानंतर दह्याचे मिश्रण घाला. पाणी घालून हे उकळून घ्या. त्यानंतर नरम मसाल्यात मिश्रणात पनीर क्युब्स घाला. तुमची ही रेसिपी तयार आहे.

loading image