esakal | Summer Recipe: उन्हाळ्यात 'या' तीन ज्यूसचे सेवन ठरते फायदेशीर
sakal

बोलून बातमी शोधा

juice

Summer Recipe: उन्हाळ्यात 'या' तीन ज्यूसचे सेवन ठरते फायदेशीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

Best Summer juice Recipe: सध्या उन्हाळा सुरु असल्याने बऱ्याच ठिकाणी अंगाची लाहीलाही होत असल्याचे दिसत आहे. अशातच कोरोनाचे थैमान देशभर असल्याने नागरिकांनी कुठे बाहेर जाता येत नाही. सगळीकडे लॉकडाउन असल्याने थंड ठिकाणीही जाण्यास मज्जाव आहे. मग या काळात घरी राहून कोणते पदार्थ किंवा ज्यूस उन्हाळ्यात आरोग्यवर्धक आहेत आणि ते कसे बनवायचे ते आज जाणून घेऊया.

बनाना वॉलनट ज्यूस-

केळी ही आरोग्याला चांगली आणि फायदेशीर मानली जातात. केळांमध्ये असणारी पोषक द्रव्ये आपले शरीर हेल्दी ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यात केळींची सेवन खूप फायदेशीर आहे. बनाना वॉलनट ज्यूस तुमच्या शरीरात दिवसभर उर्जा निर्माण करतात. ही एक उन्हाळ्यातील उत्तम ट्रीट आहे.

वाटरमेलन आणि स्ट्रॉबेरी ज्यूस-

ज्यांना स्ट्रॉबेरी आवडते त्यांच्यासाठी हा ज्यूस खास ठरतो. कलिंगड आणि स्ट्रॉबेरी दोन्हीही आरोग्यासाठी उत्तम मानले जातात. तसेच यांचे उन्हाळ्यात सेवन केले तर ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. हे दोन्ही फळे सर्वोत्तम रिफ्रेशिंग फळे आहेत, त्यामूळे त्याचा मोठा फायदा होतो.

मँगो ज्यूस-

उन्हाळ्यात सर्वात जास्त खाल्ले जाणारे हे फळ आहे. यापासून इतर बरेच पेय बनवले जातात. याच्या चवीबरोबर हे आरोग्यासाठी चांगले आहे. याचा ज्यूस उन्हाळ्यात आरोग्यवर्धक ठरतो.

loading image