सकाळच्या नाश्तासाठी झटपट बनवा हरभरा रोल; जाणून घ्या रेसीपी

सकाळच्या नाश्तासाठी झटपट बनवा हरभरा रोल; जाणून घ्या रेसीपी

हरभरा वेगवेगळ्या पध्दतीने खाल्ला जातो. कोण याला चाट म्हणून खातो तर कोण रात्री भिजत घालून सकाळी त्याची मसाला घालून किंवा कांदा, टोमॅटो घालून भाजी बनवून खातो. हरभऱ्यामध्ये माॅलिक अॅसिड, आॅक्झालिक अॅसिड असल्याने अपचन सारख्या समस्या दूर होतात. ग्रामीण भागात तर हरभरा डाळाचे पिठ चेहऱ्याला मुलतानी मातीसारखे लावले जाते. हरभरा हा ओला असतो त्यावेळी खूप खाल्ला जातो. याची हिरवी पालेभाजी ही खुप छान लागते. आज तुम्हाला हरभरा रोल सेसीपी सांगणार आहोत जी चविला ही टेस्टी असते. बनवण्य़ास ही सोपी आहे.

साहित्य

भिजवलेला हरभरा

बारीक चिरलेला कांदा

हिरवी मीर्ची

कोथंबिर

आदरक पेस्ट

लिंबाचा रस एक छोटा टमचा

लाल तिखट

जीरे

गरम मसाला

हिंग

तेल

मीठ

कृती:

भिजवलेला हरभरा कुकरमधून चार शिट्या देऊन काढून घ्या. आता यातील पाणी काढून ते गाळून घ्या. पॅनमध्ये तेल टाकून जीरे, हिंग, हिरवी मिर्ची, आदरक पेस्ट, कांदा टाकून चांगले भाजून घ्या. आता यात गरम मसाला, लाल तिखट, उकडलेला हरभरा घालून चांगले परतून घ्या. मिश्रण थोडं थंड झाले की, लिंबू पिळून घ्या. त्यावर कोथंबिर घालून मिक्स करून हे मिश्रण वाटून घ्या. आता याचा रोल बनवून १८० डिग्रीवर ओव्हनमध्ये २५-३० मिनिटे ठेऊन द्या. जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर पॅनमध्ये गॅसवरती बनवू शकता. गोल्डन ब्राऊन होईपर्यत भाजून घ्या.आता खोबरे चटणी किंवा पालक चटणी सोबत सर्व्ह करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com