माझी रेसिपी  : ब्रेडची कचोरी 

सुप्रिया खासनीस 
Saturday, 25 April 2020

आज आपण  ब्रेडची कचोरीची रेसिपी पाहू या. त्यासाठी लागणारे  साहित्य: १ स्लाईस ब्रेड, १ नारळ, दीड वाटी साखर, ७-८ वेलदोड्यांची पूड, रोझ इसेन्स, थोडासा बेदाणा. 

साहित्य : १ स्लाईस ब्रेड, १ नारळ, दीड वाटी साखर, ७-८ वेलदोड्यांची पूड, रोझ इसेन्स, थोडासा बेदाणा. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कृती : नारळ खोवून, साखर घालून त्याचे सारण करून घ्यावे. साखर विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. वेलची पूड, बेदाणे व इसेन्स घालून गार होऊ द्यावे. ब्रेडच्या स्लाईसच्या कडा सुरीने काढून टाकाव्यात. नंतर एकेक स्लाईस पाण्यात टाकून हाताने दाबून पाणी काढून टाकावे. नंतर वरील सारण घेऊन ब्रेडच्या स्लाईसवर ठेवून (साधारण १ चमचा) हाताने सर्व कडा जवळ आणून कचोरीसारखा गोल आकार द्यावा. अशा सर्व कचोऱ्या तयार करून ताटात ठेवाव्यात व अगदी आयत्यावेळी तळाव्यात. फार सुंदर लागतात. कशाच्या आहेत, ते ओळखूही येत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bread kachori recipe

Tags
टॉपिकस
Topic Tags: