
ब्रेड रोल करताना शक्यतो ताजा ब्रेड वापरावा. तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवावा. त्यामुळे ब्रेड रोल आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात. ब्रेड पाण्यातून चांगल्या पद्धतीने निथळून घ्यावा.
साहित्य - ब्रेडच्या स्लाईस, उकडलेले बटाटे, मीठ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, थोडे तेल, तळण्यासाठी तूप किंवा तेल.
कृती - ब्रेडच्या कडा कापून घ्या. बटाटे सोलून किसणीवर किसून घ्या. किसलेल्या बटाट्यांमध्ये मिरच्या व आले वाटून घाला. त्यात थोडी कोथिंबीर व चवीनुसार टाकून सारण तयार करून घ्यावे. आता एखाद्या उथळ भांड्यात पाणी घेऊन ब्रेड बुडवावेत. नंतर दाबून त्यातील पाणी काढून घ्यावे. आता ब्रेड मऊ होतील. त्यामध्ये सारण भरावे. कडा व्यवस्थित बंद करून घ्याव्यात. ब्रेड ओला असल्याने त्याची छान गुंडाळी होते. आता हे सर्व रोल तळून घ्यावेत. गरमागरम व कुरकुरीत रोल्स सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करावेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
हे लक्षात ठेवा
ब्रेड रोल करताना शक्यतो ताजा ब्रेड वापरावा.
तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवावा. त्यामुळे ब्रेड रोल आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात.
ब्रेड पाण्यातून चांगल्या पद्धतीने निथळून घ्यावा. अन्यथा तेल खूप लागते.
ब्रेड रोल तळून झाल्यावर शक्यतो पेपर नॅपकिनवर ठेवावा, त्यामुळे अतिरिक्त तेल शोषले जाते.
मिठाचा योग्य अंदाज घ्यावा, ते जास्त झाल्यास मिश्रणात बटाटा वापरावा. बटाटा अतिरिक्त मीठ शोषून घेईल.