ख्रिसमसचा केक बनविण्याचं सिक्रेट माहितेय? केक मिक्सिंगविषयी जाणून घ्या

ख्रिसमसच्या आधी अनेक हॉटेलांमध्ये केक मिक्सिंग समारंभ आयोजित केले जातात.
Cake Mixing
Cake Mixing esakal

ख्रिसमस केक हा लहानांपासून मोठ्यांना आवडणारा पदार्थ. ख्रिसमसच्या आधी अनेक हॉटेलांमध्ये केक मिक्सिंग (Cake Mixing Ceremony) समारंभ आयोजित केले जातात. केकमध्ये (Cake) वापरले जाणारे घटक एकत्र करण्यासाठी- मिसळण्यासाठी मोठ्या संख्येने लोकं सहभागी होतात. या केकचे अनेकांना आकर्षण असते. पण, ख्रिसमसच्या (Christmas) आधी केक मिक्सिंगची सुरूवात १७ व्या शतकात झाली असून ही खूप जुनी पद्धत आहे. केक मिक्सिंग म्हणजे काय आणि त्याचा इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे.

cake
cakeesakal

केक मिक्सिंग म्हणजे काय? (What is cake mixing?)

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात केक मिक्सिंगची (Cake Mixing) सुरूवात केली जाते. ही पारंपारिक पद्धत आहे. ज्यात भरपूर प्रमाणात सुका मावा, नट्स, मसाले, धान्य एकत्र करून मिश्रण तयार केले जाते. नंतर काही दिवस हे मिश्रण रम किंवा तत्सम अल्कोहोलयुक्त मिश्रणात भिजवून ठेवतात. ज्यामुळे सर्व पदार्थांची चव आणि सुगंध एकमेकांत मिसळून चव तयार होईल. शेवटी हे घटक केक बेटरमध्ये गरजेनुसार विभागले जातात. त्यातूनच पुढे ख्रिसमस केल बेक केले जातात. अनेक मोठमोठ्या हॉटेल्समध्ये हा दिवस एका सोहळ्यासारखा आयोजित केला जातो.

Cake Mixing
नाताळ सजावटीसाठी Christmas Treeला अशा प्रकारे सजवा
cake mixing
cake mixingesakal

केक मिक्समध्ये कोणते पदार्थ असतात? (What goes into the cake mix?)

केक मिक्स करण्यासाठी बदाम, काजू, मनुका, खजूर, अंजीर, वाळलेल्या चेरी, पिस्ता, (Dryfruits) दालचिनी, लवंगा, जायफळ, वाळलेले आले, मिठाईयुक्त फळे, प्रून, अक्रोड, साखर, अंडी, मैदा हे घटक योग्य प्रमाणात एकत्र केले जातात. चांगले एकत्र केल्यावर, हे मिश्रण नंतर रम, ब्रँड, वाइन किंवा फळांचे रस आणि अल्कोहोल यांच्या मिश्रणात भिजवले जाते. नंतर हे केक मिक्स हवाबंद डब्यात भरले जाते आणि किमान एक आठवडा भिजवून ठेवले जाते. अल्कोहोल हे प्रिझर्व्हेटिव्ह असल्याने मिश्रण जास्त काळ टिकते. केकचे मिश्रण वर्षभर टिकवून ठेवल्याने तुमचे नशीब फळफळते तसेच दुसऱ्यांशी आकर्षित सुसंवाद होऊ शकतो, असे म्हटले जाते.

Cake Mixing
अमेरिकेतून ब्रिटनमध्ये मागवले 300 केक; टॉम क्रूजनं पाठवलं प्रायव्हेट जेट
plum cake on Christmas Festival
plum cake on Christmas Festival esakal

असा आहे इतिहास (History Of Christmas Cake)

17 व्या शतकात डिसेंबरमधअये केक मिक्सिंग (Cake Mixing) केले जात असे. मात्र केक तयार करण्याची पद्धत फार बदलली नाही. ही परंपरा प्रत्यक्षात युरोपमध्ये सुरू झाली. संपूर्ण कुटूंब यानिमित्ताने एकत्र येत असल्याने एकता आणि कठोर परिश्रम यांचे प्रतिक म्हणून याकडे पाहिले जाते. केक मिस्क केल्यावर ते मिश्रण अल्कोहोलमध्ये भिजवून आठवडा-१५ दिवस तसेच ठेवले जाते. केक मिक्स हे पूर्वीच्या काळी गिफ्ट म्हणून देण्याची पद्धत होती. लोक केकच्या रेसिपी स्वत: तयार करून नातेवाईकांना दाखवत असत.

Cake Mixing
क्रिम ते fondant, केक डेकोरेशनच्या या भन्नाट आयडिया
cake
cake esakal

ख्रिसमस केक (Christmas Cake)

ख्रिसमस सेलिब्रेशनचा ( Christmas Celebration) अत्यंत महत्वाचा भाग म्हणून ख्रिसमस केककडे पाहिले जाते. काही दिवस आधीच घरगुती केकच्या तयारीला सुरूवात होते. फ्रुट केक, प्लम केक हे दोन लोकप्रिय केक असून तेच या काळात तयार केले जातात. मात्र त्या केकला एक वेगळा टच देण्यासाठी चव आणि अरोमा आणणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com