घरीच बनवा 'चंपारण मटन करी', जाणून घ्या रेसिपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

champaran matan

घरीच बनवा 'चंपारण मटन करी', जाणून घ्या रेसिपी

औरंगाबाद: बिहारमधील पदार्थांची यादी ज्यावेळेस समोर येते तेव्हा त्यात लिट्टी-चोखा प्रथम स्थानी राहते. कारण लिट्टी-चोखा संपूर्ण बिहारमध्ये प्रसिद्ध पदार्थ मानला जातो. ज्याप्रमाणे बिहारमध्ये लिट्टी-चोखा प्रसिद्ध आहे तसेच तिथलं 'चंपारण मटन करी'देखील बरीच प्रसिद्ध आहे. चला तर नेमंक चंपारण मटन काय आहे आणि ते कसं बनवायचं ते पाहूया.

साहित्य-

 • मटण - 500 ग्रॅम

 • कांदा - 300 ग्रॅम

 • लसूण संपूर्ण -2

 • आले-लसूण पेस्ट - 3 चमचे

 • मीठ-चवीनूसार

 • धने पावडर आणि हळद - 2 चमचे

 • मिरची आणि गरम मसाला पावडर - 2 चमचे

 • संपूर्ण गरम मसाला - 1 चमचे

 • मोहरी तेल - १ कप

 • बडीशेप पावडर - 1/2 चमचे

 • दालचिनी - 1 चमचे

 • तेजपत्ते -२

 • जिरे - १/२ चमचे

 • काळी मिरी - लवंगा - १/२ चमचे

 • कोथिंबीर - 1 चमचे

 • दही - १/२ कप

कृती-

Step 1

सर्वप्रथम मटण स्वच्छ करुन भांड्यात ठेवा.

Step 2

आता कढईत तेल गरम करून त्यात जिरे-तमालपत्र, कांदा, गरम मसाला, आले-लसूण पेस्ट आणि मीठ घालून एक मिनिट शिजवा.

Step 3

नंतर यात मटन, हळद आणि बाकीचे साहित्य टाकून काही वेळ शिजवून घ्यावे.

Step 4

15 मिनिटानंतर यात काळी मिरची, गरम मसाला आणि लवंगा घालून दही घाला आणि मटण परतून परतुन घ्या.

Step 5

20 मिनीटे शिजवून घेतल्यानंतर गॅस बंद करा. वरून त्यात कोथिंबीरी टाकून सर्व करा.

Web Title: Champaran Mutton Curry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :recipematan