
पावसाळ्यात चवदार खावसं वाटतं? ट्राय करा कणकेचा शिरा
पावसाळा सुरू झाला की वातावरणात थंडावा येतो अन मग अशावेळी चवदार काहीतरी खावं वाटतं. तेव्हा तुम्ही कणकेचा गरमागरम शिरा करुन खाऊ शकता. हा कणकेचा शिरा कसा करायचा तेच आज आपण पाहणार आहोत. (recipe of tasty kanakes shira)
हेही वाचा: मोमोज खायला आवडते? मग एम्सने दिलेला हा इशारा वाचा
कणकेचा शिरा करण्यासाठी लागणारे साहित्य:
1 वाटी कणीक(गव्हाचे पिठ)
अर्धी वाटी साजुक तूप
पाऊण वाटी गूळ
2 वाट्या कोमट पाणी
आवडीनुसार बदामाचे तुकडे
काजुचे तुकडे, बेदाणे आणि चारोळी
हेही वाचा: पावसाळ्यात खा 'या' सहा चवदार भजी, पचनक्रियाही करणार सुरुळीत!
कृती:
सर्वप्रथम एका स्टीलच्या कढईत कणीक घालून, ती गुलाबी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यावी.
कणीक गुलाबी झाली की मग त्यात तूप घालून अजून छान भाजावं. कणकेचा खमंग वास आला पाहिजे आणि रंग गुलाबी-लाल झाला पाहिजे. पण कणीक भाजताना काळजीपूर्वकरित्या भाजा, कारण कणीक लवकर जळते.
आता त्यात पाणी कोमट करून घाला आणि नीट हलवून घ्या. त्यात गुठळ्या होता कामा नये. कढईवर झाकण ठेवा आणि दणदणीत वाफ येऊ द्या.
चांगली वाफ आल्यानंतर त्यात गूळ घाला तसंच सुकामेवा घाला. नीट हलवून घ्या आणि झाकण घाला.
अगदी मंद आचेवर मधूनमधून हलवत 4-5 मिनिटं वाफ येऊ द्या. शिरा तयार आहे.
टिप- शिरा करतांना कणीक मात्र चांगली भाजली गेली पाहिजे. कारण ती नीट भाजली नाही तर शि-याचा लगदा होऊ शकतो.
Web Title: Check Here Recipe Of Tasty Kanakes Shira
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..