अंडे न वापरता बनवा चविष्ट असे 'चीजकेक', ही आहे रेसिपी

चीजकेक
चीजकेक

औरंगाबाद : कोणतेही बर्थडे पार्टी असो किंवा घरातील सेलिब्रेशन केकशिवाय पूर्ण होत नाही. केकला एक संस्मरणीय डिश बनवण्यासाठी प्रत्येक वर्षी ३० जुलै रोजी cheesecake Day साजरा केला जातो. असं म्हटलं जात, की या दिवसाची सुरुवात प्राचीन ग्रीकमध्ये झाली होती. हळूहळू तो पूर्ण जगातील पार्ट्यांमधली मुख्य भाग बनवून गेला. चीजकेक, बेक केलेला असो किंवा थंड, जगभरात त्याचा आस्वाद घेतला जातो. केक वेगवेगळ्या चवीत बनवले जातात. मात्र चीजकेकची चव अप्रतिमच असते. जर तुम्हीही यावेळेस घरीच पार्टी बनवण्यासाठी चीजकेक तयार करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला बिगर अंड्यांचे (एगलेस) चीजकेकची रेसिपी सांगणार आहोत. तर चला जाणून घेऊ या रेसिपीविषयी...

साहित्य

---

- क्रिम चीज - १ कप

- डायजेस्टिव्ह बिस्किट - २०-२५

- बटर - १/ २ कप

- हंग कर्ड/श्रीखंड - १ कप

- घोटवलेले दुध - १/४ कप

- मलाई - १ कप

- कस्टर्ड पावडर - १ मोठा चमचा

कृती

-----

- सर्वप्रथम ग्राइंडरमध्ये डायजेस्टिव्ह बिस्किट टाका. त्याचे पावडर करुन एका मोठ्या वाटीत ते काढून घ्या.

- बिस्किटच्या पावडरबरोबर बटर टाकून फ्रिजमध्ये ठेवा आणि दुसऱ्या वाटीत क्रिम चीज आणि हंग कर्ड टाकून चांगल्या प्रकारे एकत्र करुन घ्या.

- बिस्किटचे पावडर फ्रिजमधून बाहेर काढा आणि या पूर्ण मिश्रणात घोटवलेले दुध व एक मोठा चमचा कस्टर्ड पावडर टाकून चांगल्या प्रकारे एकत्र करुन घ्या.

- केक टिनला बटर पेपर लावा आणि त्यात तयार मिश्रण टाका. केक बेक करण्यापूर्वी ओव्हन गरम करुन घ्या.

- केकचे कडे जोपर्यंत फुगत नाही तोपर्यंत ओव्हनमधून ते काढू नका.

- तो साधारण ४० मिनिटांपर्यंत बेक होईल. आता ओव्हन बंद करा आणि चीजकेकला ४० मिनिटांपर्यंत आत राहू द्या.

- ४० मिनिटानंतर चीजकेक ओव्हनमधून काढा. आता तो थंड होऊ द्या. तुमचा एगलेस चीजकेक खाण्यासाठी तयार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com