Chicken Soup Recipe : हिवाळ्यात शरीराला पौष्टिक असणारे चिकन सूप कसे तयार करायचे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chicken Soup Recipe

Chicken Soup Recipe : हिवाळ्यात शरीराला पौष्टिक असणारे चिकन सूप कसे तयार करायचे?

चिकन सूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. एक कप चिकन सूपमध्ये मुबलक प्रमाणात कॅलरी असतात. याने आपले शरीर निरोगी राहते आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. चिकन सूप हा चिकन शिजवताना वापरलेल्या पाण्यापासून बनवतात. त्यामध्ये चिकनचे सर्व पौष्टिक गोष्टी उतरलेल्या असतात. त्यासोबतच ते बनवताना हळद, मीठ, लसूण, कोथिंबीर यांसारखे इतरही पदार्थ वापरलेले असतात. तेही शरीरासाठी उपयुक्त असणाऱ्या बऱ्याच गोष्टींसाठी फायदेशीर ठरते. बरेच जण ते मीठ न टाकता आळणीच पितात. चिकन सूप अजून चविष्ठ बनवायचा असेल तर त्यासाठी त्यात गाजर, कांदा, ब्रोकली आणि इतर साहित्यांचाही वापर होऊ शकतो. चिकन सूप बनवताना बहुतेक वेळा बोनलेस चिकन वापरले जाते. यामुळे त्याचा अर्क त्या सूपमध्ये मिसळून जातो.  

साहित्य

1) 200 ग्रॅम चिकन ( बोनलेस चिकन)

2) दोन तेजपानं

3) दोन चमचे बटर

4) चवीनुसार मीठ

5) अर्धी वाटी बारीक चिरलेले गाजर

6) अर्धी वाटी बारीक चिरलेली ब्रोकली

7) अर्धी वाटी बारीक चिरलेला पालक

8) पाव वाटी मक्याचे दाणे

9) दोन चमचे बारीक चिरलेल आलं लसून

10) दोन चमचे कॉर्नफ्लोर

11) एक अंड

हेही वाचा: Winter Recipe : हिवाळ्यात ज्वारीच्या पिठापासून पौष्टिक भजी कसे तयार करायचे?

कृती

सर्वप्रथम कुकरमध्ये अमूल बटर गरम करावे. त्यात तेजपत्ता टाकावा. नंतर स्वच्छ धुतलेले चिकनचे पीस त्यात टाकावेत. परतून घ्यावेत. लालसर रंग आल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट टाकून पुन्हा एकदा चिकन परतावे. नंतर चिकन शिजेल एवढे पाणी टाकून तीन ते चार शिट्या घ्याव्यात. कुकर थंड झाल्यावर शिजलेले चिकनचे बारीक तुकडे करावेत. चिकन शिजवलेले पाणी एका पातेल्यात काढावे. गॅसवर पसरट पातेल्यात ठेवावे. त्यात ते पाणी घ्यावे. मग त्यात चिकन, बारीक चिरलेल्या सर्व भाज्या टाकाव्यात. उकळी आली की त्यात एक अंड फोडून टाकावे. नीट ढवळून घ्यावे. नंतर एक वाटीत दोन चमचे पाणी घेऊन त्यात कॉर्नफ्लोरवरची पातळ पेस्ट बनवावी. ती त्यात टाकावी. नंतर मीठ आणि काळी मिरी पावडर टाकावे. अशा प्रकारे चिकन सूप तयार करावे.