Chinese: खायची इच्छा झाली आहे मग 10 मिनिटांत घरीच बनवा, पनीर चिली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Paneer Chilly Recipe

Chinese: खायची इच्छा झाली आहे, मग 10 मिनिटांत घरीच बनवा,पनीर चिली

Paneer Chilly Recipe : चायनीज खायची इच्छा झाली तर त्यासाठी तुम्हाला आता हॉटेलमध्ये जायची गरज नाही आहे,घरच्या घरीच बनवा पनीर चिली...

सध्या चायनीज पदार्थ खूप आवडीने खाल्ले जातात. विशेषतः चायनीज फ्राईड राईस किंवा नूडल्स अनेकांना खूप आवडतात. त्याचसोबत चायनीज स्टार्टर्स आणि सूपही घेण्यामागेही अनेक तरूण तरुणीचा कल असतो.

मात्र तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की?

चायनीज पदार्थ बनवणे तितकेसे अवघड नसते. आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे घरच्या घरी आणि स्वच्छ वातावरणात केलेले चायनीज आरोग्यासाठी कमी हानिकारक आहे.

चला तर मग आजच्या या लेखात आज आपण बघूया घरच्या घरी चवदार अशी पनीर चिली'ची रेसिपी कशी तयार करायची..

हेही वाचा: Kaju Malpua Recipe: घरच्या घरी भन्नाट लागणारा काजू मालपुआ कसा तयार करायचा?

साहित्य

● एक पाव ताजे पनीर

● एक वाटी उभा चिरलेला कांदा

● एक वाटी भोपळी मिरची उभी चिरून

● 10 ते12 लसूण पाकळ्या

● चिरून दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून

● एक चमचा विनेगर

● मिरपूड

● कप डार्क सोया सोस

● तिन चमचे कॉर्नफ्लोरमीठ

● चवीप्रमाणे मीठ

● तेल

हेही वाचा: Rajma Pulao Recipe: राजमा पुलाव कसा तयार करायचा?

कृती :

सर्वप्रथम पनीरचे चौकोनी तुकडे करून घ्यावे. नंतर कॉर्नफ्लोअरमध्ये दोन चिमुट मीठ घालुन त्यात थोडेसे पाणी घालून जाडसर मिश्रण तयार करावे.

या तयार मिश्रणात पनीरचे तुकडे घोळवून तेलात गोल्डन ब्राऊन रंगावर शालो फ्राय करून घ्यावे.

पुढे कढईत तेल गरम करावे आणि त्यात लसूण फोडणीला घालावा. लसूण परता आणि लगेच हिरवी मिरची कांदा आणि भोपळी मिरची घालून परतावे.

नंतर त्यात दोन चमचे सोया सॉस, शेजवान सॉस, मीठ,मिरपूड, विनेगर घालावे. पुढे मग भाज्या घालून त्या 4 ते 5 मिनिटे परतून घ्याव्या .आता यात पनीरचे तुकडे घालून परतावे.

उरलेल्या कॉर्नफ्लोरमध्ये पाणी घालून त्यात चार चमचे सोया सॉस,चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण एकजीव करावे. आणि उकळायला ठेवा. उकळी आली कि सॉस जाडसर होऊ लागेल. एकीकडे सतत ढवळत रहा.

सॉस घट्ट झाला की पनीर आणि भाज्यांवर टाकावा.वरून कांद्याची पात घाला आणि एकदा परतून लगेच सर्व्ह करायला घ्यावी पनीर चिली ..!

Web Title: Chinese If You Want To Eat Then Make This Tasty Chili Paneer Recipe At Home In 10 Minutes

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..