Chocolate Day 2024: चॉकलेट डे स्पेशलआपल्या प्रियजनांसाठी होम मेड टेस्टी चॉकलेट कसे तयार करायचे?

व्हेलेंटाईनचा तिसरा दिवस म्हणजेच चॉकलेट डे 9 फेब्रुवारी साजरा केला जातो. 
Chocolate Day 2023
Chocolate Day 2023Esakal
Summary

Chocolate Recipe: चॉकलेट खाणे खूप सुप्रसिद्ध असा गोड पदार्थ आहे. चॉकलेट चा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो म्हणजे चॉकलेट मुख्यता खाण्यासाठी वापरले जाते त्या व्यतिरिक्त एखाद्याला भेटवस्तू म्हणून देखील चॉकलेट दिले जाते किंवा एखाद्याच्या आनंदामध्ये सामील होण्यासाठी चॉकलेट चा वापर करतात.

व्हेलेंटाईनचा तिसरा दिवस म्हणजेच चॉकलेट डे 9 फेब्रुवारी साजरा केला जातो.  या दिवशी लव बर्ड्स एकमेकांना चॉकलेट देऊन प्रेम व्यक्त करतात आणि त्याचसोबत चॉकलेट डेच्या शुभेच्छा ही देतात.

आजच्या लेखात  आपण चॉकलेट डे स्पेशल आपल्या प्रियजनासाठी होम मेड टेस्टी चॉकलेट कसे तयार करायचे याची सविस्तर  रेसिपीज  पाहणार  आहोत.

साहित्य

1) कोको पावडर दोन वाटी

2) बटर तीन चतुर्थांश वाटी

3) साखर अर्धा वाटी

4) दूध दोन वाटी

5) मैदा एक चतुर्थांश वाटी

6) पिठी साखर एक चतुर्थांश वाटी

 7) एक कप पाणी

Chocolate Day 2023
Dark Chocolate : डार्क चॉकलेट खाल्ल्याने या समस्या होतील दूर

कृती:

सर्वप्रथम कोको पावडर आणि बटर फूड प्रोसेसरमध्ये टाका. प्रोसेसरमध्ये याची स्मूथ चॉकलेट पेस्ट तयार करा. आता एका पॅनमध्ये एक चतुर्थांश पाणी टाका पाण्यावर एका बाऊल ठेवा. या बाऊलमध्ये चॉकलेट पेस्ट टाका आणि या पेस्टला गरम करा. त्यानंतर या पेस्टला पुन्हा प्रेसरमध्ये टाकून मिक्स करा. आता दूधाला रूम टेंप्रेचरमध्ये गरम करा. चॉकलेट पेस्टमध्ये साखर, मैदा आणि दूध टाकून मिक्स करा. यामध्ये गाठी होणार नाही याची काळजी घ्या. तयार झालेल्या या मिश्रणाला चॉकलेट मोल्डमध्ये टाका. हे मोल्ड फ्रिजमध्ये ठेवा. चॉकलेट फ्रिजमध्ये कडक होते. तुमचे होम मेड टेस्टी चॉकलेट तयार आहे. चॉकलेटमुळे आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारे फायदे होतात. यामधील नैसर्गिक तत्वे आपल्याला आनंदी आणि तजेलदार ठेवण्यास मदत करतं. विशेषत; चॉकलेटमधील ट्रिप्टोफॅन आपल्याला आनंदी आणि मेंदूमधील इंडॉरफिनच्या पातळीवर प्रभावशील ठरतं. चॉकलेटचं सेवन आपल्या हृदयासाठी सुद्धा उत्तम ठरतं. 'डार्क चॉकोलेट' खाण्यामुळे हृदयाच्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com