esakal | ‘छोले भटुरे’ हा माझा आवडता प्रकार ; अमृता देशमुख
sakal

बोलून बातमी शोधा

amruta deshmukh

‘छोले भटुरे’ हा माझा आवडता प्रकार ; अमृता देशमुख

sakal_logo
By
शब्दांकन : अरुण सुर्वे

मला स्वयंपाक फारसा जमत नसला, तरी मला खायला खूप आवडतं. असं म्हणतात, की ज्यांना उत्तम स्वयंपाक जमतो, त्या आत्मनिर्भर असतात, तशी मी पूर्णपणे माझ्या आईवर ‘निर्भर’ आहे.

अचानक एखादी वेगळी डिश खावीशी वाटली, तर पंजाबी डिशेसपैकी ‘छोले भटुरे’ हा माझा आवडता प्रकार आहे. बाहेर खाण्याऐवजी आपण घरी हा पदार्थ केला तर उत्तम दर्जाचे तेल, योग्य प्रमाणात मसाल्यांचा वापर करून छान बनवता येतो. माझ्या मते बाहेर मिळणारे भटुरे हे तुलनेनं फार मोठे असतात, म्हणून हे भटुरे मी घरी करते तेव्हा मला हवे तसे आणि योग्य त्या आकारात करता येतात. मुख्य म्हणजे ते अत्यंत पौष्टिक होतात आणि त्यांचा त्रासही होत नाही. आम्हीही घरी छोले भटुरे करून बघण्याचा प्रयोग केला होता आणि ते योग्य पद्धतीनं बनवल्यानं खादिष्टही झाले होते.

माझी आई सुगरण असल्याने मला हे जमेल की नाही याची शंका होती; पण ते जमले. लॉकडाऊन काळात आईमुळे मला खाण्याचा ‘पोटभर’ आनंद मिळाला. आता आम्ही घरात नेहमीच विविध पदार्थ बनवत असतो. त्यासाठी मी आईला मदत करत असते. त्यातून मलाही आनंद मिळतो.

loading image
go to top