Colonel Sanders : केएफसीचं चिकन लोकांना एवढं का आवडतं माहितीये?

Colonel Sanders : केएफसीचं चिकन
Colonel Sanders : केएफसीचं चिकन
Updated on

‘विज्ञान’(Science) नेहमी गंभीर किंवा ठराविक-साचेबद्ध प्रश्नांचीच उत्तरं देतं किंवा शोधतं असं नाही तर ते ‘मुंग्या रांगेत का चालतात?’ यापासून ‘महाविस्फोटाचं रहस्य काय?’ अश्या एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न नक्की करतं.

आता हेच बघा ना ‘मेलडी (Melody) इतनी चाॅकलेटी क्यूॅं हैं?’ या सरळसाध्या बाळबोध प्रश्नाचं उत्तर रसायनशास्त्राच्या भाषेत “कारण मेलडीत सेल्युलोज गम-पाॅलिसाॅरबेट-कॅराजिनन-मोनो डायग्लिसेराईड्स यासह अनेक रसायनांचं विशिष्ट प्रमाणातलं मिश्रण आहे” असं आहे.

घरचा चहा(Tea) ‘अमुक’ चहासारखा का बनत नाही कारण त्या ब्रॅंडच्या चहात ‘मेलामाईन’ किंवा तत्सम घटक आहे. सिंपल.

हाताला चव-बनवणाऱ्याचं प्रेम-सिक्रेट रेसिपी वगैरे बोलण्यापुरतं ठिके पण यासोबतच ठराविक ‘फाॅर्म्युला’ जुळून यावा लागतो.

संपुर्ण आयुष्यभर हजारो वेळा अपयशी ठरल्यानंतर वयाच्या ६५व्या वर्षी ‘केएफसी’(KFC) अर्थात केंटुकी फ्राइड चिकनचा (Kentucky Fried Chicken)असाच ‘फाॅर्म्युला’ गवसल्यानंतर यशाची चव चाखणाऱ्या आणि आजघडीला दिडशेहून अधिक देशात बावीस हजाराहून अधिक स्टोअर्सच्या रुपानं जिवंत असलेल्या कर्नल सॅंडर्सची (Colonel Sanders) बहुचर्चित गोष्ट तुम्हाला ठाऊक असेलच आज “हा ब्रॅंड इतका लोकप्रिय का झाला?” यामागची वैज्ञानिक गोष्ट सांगतो. (Colonel Sanders Why do people Love so much about KFC's chicken)

सरसकट असं नाही पण माणसाला सकस-चौरस जेवणापेक्षा फास्टफूड-जंकफूड-स्ट्रीटफूड चटकन आकर्षित करतं,अश्या ठिकाणी लोकं गर्दी करतात कारण शेवटी माणसं असली तरी ते प्राणीच.

माणुसही जंगलातच उत्क्रांत झाल्यानं त्याचा मेंदू हा अतिरिक्त कॅलरीज असलेलं अन्न ओळखण्यासाठी प्रशिक्षित झालाय-त्याचं शरीर निसर्गत: अतिरिक्त कॅलरीजचं सेवन करण्यासाठीच बनलंय त्यामुळंच बहुतांश लोकांचे टेस्ट बड्सही तसेच विकसित होत गेले.

कच्च्या चिकनच्या कॅलरीची घनता १.३५ असते तर केएफसी जे चिकन निवडून आणतं त्यात आधीच हे प्रमाण २.३असतं. त्याला खरपुस बनवल्यानंतर ते २.९ इतकं होतं परिणामी साधं हलकं खाण्यापेक्षा माणसाचा नैसर्गिक ओढा याकडं वळतो. यासोबतच उत्क्रांत होण्याच्या प्रवासात घर्मग्रंथी सर्वाधिक कार्यरत असल्यानं शरीराची सोडियमची गरज भागावी म्हणून माणुस अतिरिक्त ‘खारट’ खाण्यासाठीही तयार झालाय.

केएफसीच्या चिकनमध्ये १.१ ग्रॅम सोडियम असतं जे दैनंदिन गरजेच्या तब्बल ४८% अधिक असलं तरी माणसाचा नैसर्गिक कल याकडंच झुकतो.

खाद्योगात अनेक चव वाढवणारे घटक सर्रास वापरले जातात तसं केएफसीच्या अनेक पदार्थात मोनोसोडिअम ग्लुटामेट अर्थात ‘एमएसजी’ हा मिटक्या मारायला भाग पाडणारा पदार्थ मिसळला जातो.

एमएसजी हे रसायन शरीरास फारसं घातक नसल्यानं त्यानं तसं काही नुकसान किंवा मानवी आरोग्यावर कुठला नकारात्मक परिणामही नाही.

बाहरेच्या अनेक खाद्यपदार्थाचं यश चवीसोबतच तो योग्य तापमानाला बनणं’ यातही असतं तसं केएफसीचं एक रहस्य ते वापरत असलेल्या प्रेशर फ्रायर्स मध्ये आहे.

योग्य साधनांविना आणि अप्रशिक्षित लोकांसह हे फ्रायर्स प्रसंगी कुचकामी ठरू शकतात परंतु केएफसी यासाठी भरपूर काळजी घेतं यामुळं कमी वेळात-कमी तेलात-कमी इंधनात त्यांचे रुचकर पदार्थ तयार होतात.

पाणी-तेल-चरबी यांचं पायसीकरण तोंडात अतिरिक्त लाळ जमा करतं आणि माणूस खात रहातो.

घरगुती किंवा पारंपरिक चिकनच्या तुलनेत हे सगळं टेस्टबड्सना चटकन उद्दिपित करणारं असल्यानं एकदा चाखले की केएफसीचे पदार्थ वारंवार चाखावेसे वाटत रहातात.

माणसाला एकसारखं खाण्यापेक्षा वेगवेगळे ‘पोत’ असलेले पदार्थ चाखून मानसिक आनंद मिळतो असं मनोविश्लेषक सांगतात त्यामुळं केएफसीतल्या फ्राय्ड टाॅर्टिला-ग्राऊंड बीफ-कूकी वेफर्स-माॅईस्ट चिकन विविधरंगी विविधढंगी पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते.

केएफसीतल्या पदार्थात भरमसाठ वापरली जाणारी काळी आणि पांढरी मिरी तर लोकांच्या जीभेवर नव्हे तर थेट मेंदूवर राज्य करते..काय म्हणता कसं?

या मिरीत ‘पेपरीन’ नावाचा महत्वपुर्ण घटक असतो जो मेंदूतली विशिष्ट आशादायी चेतना जागृत करतो त्यामुळं माणसाला एकुणच ताजंतवाणं वाटायला मदत होते.

चहापासून केकपर्यंत अन्नाचा विशिष्ट वास माणसाची तलफ चाळवत असतो.

जेव्हा पदार्थ चाखण्याआधी त्याचा अपेक्षित वास येत नाही तेव्हा माणूस हळूहळू कंटाळतो-तो पदार्थ टाळू लागतो परंतु केएफसीतले ११ वनस्पती आणि विविध मसाले नाक आणि मेंदू यांच्यातलं कनेक्शन कधी तुटू देत नाही..

अर्थात हे सगळं तेव्हा घडतं जेव्हा कर्नल सॅंडर्स नावाचे एक ज्येष्ठ नागरिक “स्वप्न बघण्यासाठी वयाचं बंधन नसतं” हे सिद्ध करतात.

आज केएफसीचे सर्वेसर्वा कर्नल सॅंडर्स यांचा स्मृतीदिन..

विनम्र अभिवादन !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com