Crispy Jwariche Dhirde: नाश्त्यासाठी झटपट बनवा ज्वारीच्या पिठाचे धिरडे, जाणून घ्या रेसिपी

Crispy Jwariche Dhirde: सकाळी नाश्त्यात ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवू शकता.
Crispy Jwariche Dhirde
Crispy Jwariche DhirdeSakal
Updated on

Crispy Jwariche Dhirde: सकाळी नाश्त्यात तांदळाच्या आणि गव्हाच्या पिठाचे धिरडे खाल्ले असेल. पण तुम्ही ज्वारीच्या पिठाचे धरडे खाल्ले आह का? नसेल तर सकाळच्या नाश्त्यात पौष्टिक असे ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवू शकता. हे धिरडे बनवायला सोपे आणि चवदार आहेत. चला तर मग जाणून घेऊया ज्वारीच्या पिठाचे धिरडे कसे बनवावे.

ज्वारीच्या पिठाचे धिरडं बनवण्यासाठी लागणारे साहित्य

१ कप ज्वारीचं पीठ

१/४ कप तांदळाचं पीठ

१/४ कप पाणी

१/२ चमचा धनेपूड

१/२ चमचा जिरं

बारीक चिरलेली ढोबळी मिरची

बारीक चिरलेला टोमॅटो

चिरलेली हिरवी मिरची

१/४ चमचा हळद

किसलेलं गाजर

चवीनुसार मीठ

१/२ लिंबाचा रस

तेल

Crispy Jwariche Dhirde
Morning Breakfast Recipe: उरलेल्या चपातीपासून बनवा स्वादिष्ट समोसा, जाणून घ्या रेसिपी

ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवण्याची कृती

ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात ज्वारीचे पीठ आणि तांदळाचे पीठ घ्यावे. नंतर त्यात मीठ टाकावे. थोडे पाणी टाकून पातळ मिश्रण तयार करावे.नंतर त्यात तेलाची फोडणी म्हणजेच तेल गरम करून जीर,मोहरी, कडीपत्त्याची पाने टाकावे. नंतर यात बारिक चिरलेल्या भाज्या टाका. नंतर तवा गरम करावा आणि धिरडे करावे. हिरव्या चटणीसोबत धिरड्याचा आस्वाद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com