esakal | Cucumber Idli: आता ब्रेकफास्टसाठी काकडी पासून बनवा झटपट इडली; जाणून घ्या रेसिपी
sakal

बोलून बातमी शोधा

Cucumber Idli

Cucumber Idli: आता ब्रेकफास्टसाठी काकडी पासून बनवा झटपट इडली

sakal_logo
By
अर्चना बनगे

सकाळचा ब्रेकफास्ट पोटभरून करायचा असेल तर इडलीला जास्त पसंती दिली जाते. भारतीय अनेक कुटुंबामध्ये विशेषता ब्रेकफास्टमध्ये रविवारी इडली ही असतेच. गरम गरम इडली सोबत नारळाची चटणी आणि वाफाळलेला चहा असेल तर कोल्हापूरी भाषेत जग जिंकल्याचाच फिल. इडली स्वादिष्ट असण्याबरोबरच पचण्यास हलकी देखील असते. इडली आवडण्याची अनेक कारणे आहेत. पण फक्त एक छोटीशी अडचण आहे, ती म्हणजे ही स्वादिष्ट दक्षिण भारतीय डिश तयार करण्यासाठी तांदूळ भिजवण्यापासून ते आंबवण्यापर्यंत लागणारा वेळ. कारण त्याची तयारी करण्यासाठी वेळ लागतो. पण जर अचानक तुम्हाला खाण्याची इच्छा झाली आणि तुमच्याकडे इडली पिठ नसेल तर? काळजी करू नका. कारण झटपट इडली कशी बनवायची हे आज तुम्हाला सांगणार आहोत.

काकडी इडली

काकडी इडली हा झटपट नाश्ता आहे. जो देशातील कर्नाटक आणि कोकणी भागात लोकप्रिय आहे. नाश्त्याचा हा एक वेगळा प्रकार आहे जो तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवा. त्यासाठी आंबवणे या प्रक्रियेची आवश्यकता नाही. फक्त काकडी आणि रवा या दोन वस्तू तुमच्याकडे असल्या की इडली झटपट होऊ शकते. काकडीला कूलिंग चव असल्याने मसालेदार चटणी सोबत जोडून पौष्टिक नाश्ता तयार करता येतो. पिठ तयार झाल्यावर, सुमारे 20 मिनिटे वाफवून घ्या आणि आपल्या स्वयंपाकघरातील प्रसिद्ध कोकणी नाश्त्याचा आनंद घ्या.

काकडी इडली रेसिपी कशी बनवायची:

थोडी मऊ काकडी घ्या आणि किसून घ्या, पाणी काढून टाका. किसलेली काकडी, रवा आणि इतर साहित्य एका भांड्यात ठेवा आणि काही काळ भिजवा. तुमचा स्टीमर चालू करा आणि या इडल्या २० मिनिटे वाफवा. आचेवरून काढा आणि गरम सर्व्ह करा.

loading image
go to top