

आंब्याचा उपयोग करून भरपूर पाककृती तयार केल्या जातात.
दिवाळी सण हा सर्वांचा आवडीचा सण. हा सण काही दिवसांवर आलाय. दिवाळीचा फराळ हा शक्यतो घरीच बनवणे पंसत करतात. लाडू, चकली चिवडा, शंकपाळे सर्व पदार्थ घरीच बनवितात. आंब्याचा उपयोग करून भरपूर पाककृती तयार केल्या जातात. तुम्हाला जर असाच हटके पदार्थ घरीच बनवायचा असेल तर आंबा बर्फी ट्राय करा. घरच्या घरीच एकदम मस्त बर्फी तुम्ही बनवू शकता. घरातील मोठ्यांपासून छोट्यापर्यंत हा पदार्थ सर्वांना नक्की आवडेल.
साहित्य
- आंब्याचा मावा अर्धा किलो (हल्ली विकत मिळतो)
- पाव किलो खवा
- दोन वाट्या साखर
- एक वाटी पाणी
- दोन टे.स्पून पिठीसाखर
- दोन टे.स्पून दूध पावडर
- एक चमचा वेलची व जायफळ पूड
कृती
- आंब्याचा मावा आणि खवा एकत्र करुन पुरणयंत्रातून किंवा मिक्सरमधून फिरवून घ्या.
- एका जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत दोन वाट्या साखरेत एक वाटी पाणी घालून तीन तारी पाक करा. त्यात हे खवा-मावा मिश्रण घालून नीट ढवळा. - चार-पाच मिनिटे मंद आचेवर ढवळत राहा.
- बुडबुडे यायल्या लागल्यावर कढईत अगदी मध्यभागी बुडबुडा येऊन फुटला की गॅस बंद करा.
- थोडे ढवळून त्यात वेलची- जायफळ पूड, दूध पावडर आणि पिठीसाखर घालून घोटून घ्या.
- साधारण श्रीखंडापेक्षा घट्ट वाटायला लागल्यावर तूप लावलेल्या थाळ्यामध्ये ओता. थाळी ठोकून सगळीकडे नीट पसरवा.
- दोन ते अडीच तासांनी वड्या कापा. त्यावरुन शोभेसाठी सिल्वर कागद लावायचा असेल तर गरम असतानाच लावा. किंवा काजू, चारोळी, भोपळ्याची बी प्रत्येक वडीवर लावा.
- या प्रमाणात बर्फीचे साधारण 30 ते 35 तुकडे पडतात.
(संदर्भ: पुस्तक- दिवाळी फराळ, सकाळ प्रकाशन, लेखिका-जयश्री कुबेर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.