Diwali Recipes : अनारसे बिघडतात? पहा अनारशाचे तीन प्रकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Recipes : अनारसे बिघडतात? पहा अनारशाचे तीन प्रकार

Diwali Recipes : अनारसे बिघडतात? पहा अनारशाचे तीन प्रकार

पुणे : दसरा संपला आणि घरोघरी आता दिवाळीची लगबग सुरू झाली आहे. दिवाळीची खरेदी, फटाके आणि फराळ या गोष्टींची यादी, सुट्टीचे प्लॅनिंग यात सगळे गुंग असतील. सध्या फराळ बनवायला कोणाला वेळ आहे. त्यामुळे तो विकत आणला जातो. पण, त्याला घरची चव नसते. त्यामुळे तो नीट खाल्लाही जात नाही. दिवाळीत आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे अनारसे. कुरकूरीत आणि तोंडात विरघळतील असे अनारसे सगळ्यांनाच आवडतात. हेच अनारसे पारंपरिक पद्धतीने न बनवता वेगळ्या पद्धतीने कसे बनवले जातात हे पाहुयात.

हेही वाचा: Diwali Recipe: दिवाळी स्पेशल पारंपरिक पद्धतीने खजुऱ्या कशा तयार करायच्या?

कमी वेळात होणारे झटपट अनारसे

साहित्य

1 वाटी गूळ, 1 वाटी तांदळाचे पीठ, केळी, वेलची पूड, तळणीसाठी तेल, खसखस

कृती

रेडीमेड तांदळाच्या पीठ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या. त्यामध्ये थोडा गूळ घालून वाटा. एक वाटी गूळ घातल्यानंतरही पिठाचा गोळा होत नसेल तर त्यामध्ये केळ्याचे स्लाईस घालून वाटा.

पिठाचा गोळा हाताने मळला जात असेल त्यावेळी तो बाहेर काढून मळायला घ्या. पीठ मळताना त्यामध्ये वेलची पूड घाला. पिठाचा एकदम मऊसूत असा गोळा व्हायला हवा. यामध्ये पाणी अजिबात घालायचे नाही. त्यामुळे ते हाताच्या उष्णतेवरच मळत राहायचे आहे. अनारसे करायला घेताना छोटे गोळे करुन हातावर. खसखसवर अनारसे नाचवून ते तेलात किंवा तुपात तळून घ्या.

हेही वाचा: Kojagiri Purnima Milk Recipe: कोजागिरी स्पेशल दूध कसे तयार करायचे?

डायटींगवर असलेल्या लोकांसाठी खास गुळाचे अनारसे

साहित्य

2 वाटी तांदळाचे पीठ, 1 वाटी गूळ, खसखस, तळणीसाठी तेल

कृती

तांदूळ तीन दिवस भिजत घाला. चौथ्या दिवशी एका कापडावर काढून ते छान कोरडे करुन घ्या. त्यानंतर तांदूळ वाटून घ्या. एका मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये तांदूळाचे पीठ आणि त्याच्या बारीक केलेला गूळ मिक्सरमधू वाटून घ्या.

हे पीठ एका बंद डब्यामध्ये साधारण 4 ते 5 तासांसाठी काढून ठेवा. त्यानंतर आवश्यक तेवढे पीठ काढून तुम्ही त्यामध्ये गरजेनुसार दूध घालून ते छान मळून घ्या. मऊसूत गोळा झाला की, मग त्याचे अनारसे हापावर थापून ते तळून घ्या.

हेही वाचा: Food Recipe : अंड्याशिवाय बनवा फ्रेंच टोस्ट

मऊसूत असे खव्याचे अनारसे

साहीत्य

तांदळाचे पीठ, 2 मोठे चमचे खवा, ¼ वाटी गूळ, खसखस, तूप, तळणीसाठी तेल

कृती

तांदळाच्या पीठात दोन मोठे चमचे खवा घाला. त्यामध्ये गूळ घालून सगळे साहित्य एकजीव करुन मळून घ्या. पीठ हाताला चिकटत असेल तर त्यामध्ये थोडेसे तूप घाला. तयार पिठाचे त्याचे अनारसे थापून त्यावर खसखस लावा. मध्यम आचेवर अनारसे तळून घ्या.