दिवाळी विशेष: फटाफट चटपटीत कडबोळी 

कुबेर
Friday, 13 November 2020

वर्षातून एकदा येणारा सगळ्यांचा लाडका सण म्हणजे दिवाळी आणि दिवाळीचा सगळ्यात लाडकी  आणि घराला एकत्र जोडून ठेवणारी खास गोष्ट  म्हणजे घरी बनवलेला दिवाळीचा फराळ. दरवर्षी तितक्याच प्रेमानं आपण फराळावर ताव मारतो. फराळाशिवाय दिवाळी हे समीकरण जुळतच नाही.

पुणे:

वर्षातून एकदा येणारा सगळ्यांचा लाडका सण म्हणजे दिवाळी आणि दिवाळीचा सगळ्यात लाडकी  आणि घराला एकत्र जोडून ठेवणारी खास गोष्ट  म्हणजे घरी बनवलेला दिवाळीचा फराळ. दरवर्षी तितक्याच प्रेमानं आपण फराळावर ताव मारतो. फराळाशिवाय दिवाळी हे समीकरण जुळतच नाही. काहीसा गोड, काहीसा तिखट व बराचसा खुसखुशीत ठेवा म्हणजे फराळ! चिवडा, चकली, लाडू, करंजी हे पदार्थ म्हणजे दिवाळीचा फराळ. गेल्या काही वर्षांपासून आपण हेच पदार्थ बनवत आणि खात आलोय. अगदी  पिढ्यान् पिढ्या आपल्याकडे हे पदार्थ बनवत आले आहेत. आपल्याकडे केवळ हेच पदार्थ बनतात असे नाही.आजकाल ओफिस च्या वेळा सांभाळून कमी वेळामध्ये फटाफट फराळ बनवावा लागतो आणि त्यात पौष्टिक बनवले तर सोन्याहून पिवळं त्यामुळे आजकाल खूप नवीन नवीन पदार्थ बघायला आणि खायला देखील मिळतात. यांचे मूळ हे जुनेच असते फकत त्यामध्ये काही सोयीनुसार बदल करून कमी वेळात घरात जे सामान उपलब्ध आहे त्यामध्ये बनवलेले असतात . यावर्षी या पँडेमिक सिटूएशन मध्ये वर्क फ्रॉम होमी करता करता सगळ्यांनी मिळून फराळ बनवायची मजा काही वेगळीच आहे आधीच पँडेमिक मुळे घरकाम हे सगळे मिळून करत आहेत तसाच दिवाळीचा फराळ देखील सगळ्यांनी मिळून केला तर कमी वेळात फटाफट होणारे काहीचटपटीत पदार्थ या दिवाळीमध्ये अजूनच मजा आणतील. वर्क फॉर्म होमी सांभाळून आणि घरातल्यांचा मूड सांभाळून फराळ बनवण्यासाठी चटपटीत फटाफट कडबोळी रेसिपी देत आहे. 

साहित्य :
१ कप नाचणीचे पीठ 
१/२ कप ज्वारीचे पीठ
१/२ कप डाळीचे पीठ  
१/३ तांदूळ पीठ
१.५ चमचे लोणी 
२ चमचे पांढरे तीळ 
चवीनुसार लाल तिखट 
१/२ छोटा चमचा हळद 
१/२ छोटा चमचा हिंग 
१ छोटा चमचा ओवा (आवडीप्रमाणे)
चवीनुसार मीठ 
पाणी 

पध्दत:
नाचणी, तांदूळ, ज्वारी पीठ, डाळीचे पीठ फक्त जरा गरम होईपर्यंत भाजून घेणे. 
पांढरे तीळ वेगळे भाजून घेणे. 
सगळी पीठं  एकत्र करून त्यामध्ये लोणी, तिखट, मीठ , हळद, हिंग असे मिक्स करून घेणे. 
आणि मग हळू हळू पाणी घालून साधारण १०,१५ मिनिटं पीठ चांगले मळून घेणे. 
मळलेले  पीठ १०,१५ मिनिटं झाकून भिजण्यासाठी ठेवावे. 
त्यानंतर पोळपाटावर गोळा घेऊन घोळून कडबोळे तयार करणे. 
तेल किंवा तूप तापत ठेवणे, एका वेळी ५,६ कडबोळी आधी मोठ्या आचेवर आणि मग मंद आचेवर तळावे. 
अश्या पद्धतीने आपली फटाफट कडबोळी झाली तयार 
या अश्याच कमी वेळात फटाफट होणाऱ्या पाककृती करूयात आणि वर्क फ्रॉम होम आणि दिवाळीचा फराळ घरी बनवून दिवाळीची मजा देखील घेऊयात..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali Special Faral - Kadboli