

Sanjeev Kapoor Special Chocolate Barfi
sakal
SANJEEV KAPOOR CHOCOLATE BURFI RECIPE: दिवाळी म्हटलं की घरात फराळाची तयारी, पाहुण्यांची ये-जा आणि गोडधोड पदार्थांची रेलचेल सुरू होते. या सणात घरी काहीतरी वेगळं आणि चविष्ट बनवायचं असेल, तर चॉकलेट बर्फी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे, ही बर्फी बनवण्यासाठी जास्त साहित्य किंवा खूप वेळ लागणार नाही.
प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी चॉकलेट बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी शेअर केली आहे. पारंपरिक मावा बर्फीला चॉकलेटची चव देऊन ही मिठाई तयार केली जाते. यात बर्फीचे दोन थर असल्यामुळे ती दिसायलाही आकर्षक लागते. चला तर मग, जाणून घेऊया चॉकलेट बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी.