esakal | तुम्हाला चिकन खायला आवडते? तर घरीच तयार करा तिखट मुर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

Do you like to eat chicken So make chili chicken at home

काही लोकांना रोज नॉन वेज खायला दिले तरी ते नाही म्हणत नाही. चला तर जाणून घेऊया तिखट मुर्ग बनविण्याची पद्धत...

तुम्हाला चिकन खायला आवडते? तर घरीच तयार करा तिखट मुर्ग

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : दहापैकी ८ जणांना नॉन वेज खायला आवडते. कोंबडी, मटण, मच्छी, झिंगे हे अनेकांचे आवडते असतात. मात्र, यात अनेकांना चिकन सर्वाधिक आवडते. तसेही चिकन जगातील कोणत्याही भागात सहज घरी बनविता येते. काही लोकांना रोज नॉन वेज खायला दिले तरी ते नाही म्हणत नाही. चला तर जाणून घेऊया तिखट मुर्ग बनविण्याची पद्धत...

ही आहे सामग्री

या रेसिपीसाठी आपल्याला हाड नसलेले चिकन, कांदा, टोमॅटो, टोमॅटो पेस्ट, कढीपत्ता, कोरडे पुदिना पाने, लाल तिखट, जिरे पूड, जिरा पावडर, सोफ, मिरची, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, मीठ, तेल आदींची गरज आहे.

तिखट मुर्ग रेसिपीची पद्धत

सर्वांत अगोदर कढईत तेल गरम करून कढीपत्ता घाला. ते थंड होऊ द्या आणि चिरडू द्या. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट घाला आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा. यानंतर मिश्रणामध्ये चिकन मिक्स करा आणि थोडा वेळ शिजवा. टोमॅटोची पेस्ट, मीठ, मिरपूड, जिरेपूड, तिखट घाला. सर्वकाही एकत्र मिसळा आणि १५ मिनिटांसाठी झाकण बंद करा. यानंतर कढीपत्ता, पुदीनाची पाने टाकून खायला द्या.