वाईन बद्दल सात गोष्टी, ज्या तुम्हाला माहिती असायला हव्यात

do you know these seven things about wine Marathi article
do you know these seven things about wine Marathi article

वाईन विषयी तुम्हाला किती माहिती आहे? वाइनच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या स्वीट वाइन, क्रॉर्क्ड, बुके किंवा फिन्श या टर्मबद्दल तुमच्या  मनात देखील गोंधळ आहे का? तर आज आपण या सगळ्या टर्म्सबद्दल काही मूलभूत अशा गोष्टींची माहिती घेणार आहोत जेणेकरुन तुम्हाला देखील वाईन हा विषय चांगल्या पध्दतीने समजून घेता येईल.

ड्राय वाईन -
या प्रकारातील वाइन ही नैसर्गिकरित्या आलेला गोडवाच यामध्ये असतो. त्यामुळे या वाइनमध्ये गोडी खूपच कमी असते  ज्यामुळे या वाइनला ड्राई वाइन म्हणतात.

स्वीट वाईन -
या प्रकारच्या वाईन मध्ये भरपूर साखर असते. म्हणून या वाईनला डिजर्ट वाइन किंवा पुडिंग वाईन देखील म्हणतात. 

अॅसिडिक वाईन -
ज्या कच्च्या मालापासून ही वाईन बनवण्यात येते त्यामध्ये नैसर्गिकरीत्या  अॅसिड असते, तसेच वाइनच्या फर्मेंटेशन दरम्यान देखील काही अॅसिड त्यामटेध्ये तयार होतात. त्यामुळे या वाइनची चव ही लिंबू किंवा व्हीनेगरसारखी लागते. 

टॅनिन्स -
फिनोलिक नावाच्या कंपाऊंडमुळे वाईनला कडू चव देते. तसेच टॅनिन हा घटक वाईनची ही कटुता टिकवून ठेवते. चहाची जशी कडवट चव असते तशी चव या वाईनला येते. टॅनिन एक नैसर्गिक प्रिडर्वेटिव देखील आहे, जो वाइन दीर्घकाळ टिकावी म्हणून प्रक्रियेत वापरला जातो.

बुके-
जुन्या वाइनचा वासासा बुके म्हणून ओळखले जाते. जेव्हा आपण वाइनची गुणवत्ता तपासता तेव्हा बुके हा पहिला निकष असतो. वाइनमध्ये फळे, मसाल्यांच्या व्यतिरिक्त अनेक प्रकारच्या सुगंध असू शकतात. मात्र ते द्राक्षांच्या विविधता, त्याची स्थिती आणि ते उत्पादनाचे ठिकाण यावर अवलंबून असते. 

कॉर्क्ड-
एखादी वाईन खराब झाली असेल तर अशा वाइनला क्रॉर्क्ड वाईन असे म्हणतात. 

फिनिश-
फिनिश हा एक प्रकारचा स्वाद आहे, जो वाइन प्यायल्यानंतरही काही काळ आपल्या तोंडात राहतो. याला वाईनची अफ्टर टेस्ट असे देखील म्हणतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com