मशरूमची कॉफी प्यायलीय का? जाणून घ्या आणखी फायदे National Mushroom Day | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मशरूम कॉफी

National Mushroom Day : मशरूमची कॉफी प्यायलीय का? जाणून घ्या आणखी फायदे 

अप्रतिम चव आणि स्वाद असणारे मशरूम हे शाकाहारी आहेत. पूर्वी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मिळणारे मशरूम आता कुठेही अगदी सहज मिळतात. भाजीपासून सुप पर्यंत त्यांचे विविध प्रकार तुम्ही हॉटेल्समध्ये खाल्ले असतील. घरीही केले असतील, पण मशरूमची कॉफी कधी प्यायलीत का ?

हो अशी कॉफी आहे. फोर सिग्मॅटिक या अमेरिकन कंपनीच्या असलेल्या या कॉफीतील महत्वाचा घटक मशरूम हा आहे. ही कॉफी रेशी (Reishi)या मशरुमपासून तयार करण्यात आली आहे. यामध्ये असणाऱया घटकांमुळे त्वचा निरोगी राहते. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण आणि चयापचय क्रियेत योग्य ते समतोल राखण्याचे काम ही मशरूम कॉफी करते. त्यामुळे वेगळेपणा म्हणून अशी कॉफी पिण्याचा नक्की प्रयत्न करा.

असे आहेत मशरूमचे औषधी उपयोग

यात प्रोटिनचा भरपूर समावेश असतो.

व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम आणि फायबरचं प्रमाण यात अधिक असल्याने हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते.

स्तनांचा कॅन्सर होण्यापासून बचाव होतो.

अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते.

खनिजांचा भरपूर साठा असल्याने यकृत निरोगी ठेवण्यास मदत होते.

चयापचय शक्ती सुधारते.

कॅलरीजचं प्रमाण कमी असल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.