Sweet Corn Soup : हिवाळ्यात प्या स्वीट कॉर्न सूप, जाणून घ्या फायदे?

स्वीट कॉर्न आरोग्यासाठी फायदेशीर असते.
स्वीट कॉर्न सूप
स्वीट कॉर्न सूप

Sweet Corn Soup Health Benefits: स्वीट कॉर्न आरोग्यासाठी फायदेशीर असते. स्वीट कॉर्नचे नाव घेताच तोंडाला पाणी सुटते. हिवाळ्यात स्वीट कॉर्न सूप खाल्यास इम्युनिटी मजबूत होते आणि वजन कंट्रोल करू शकता.

Sweet Corn Soup Health Benefits:स्वीट कॉर्न आरोग्यासाठी फायदेशीर असते. स्वीट कॉर्नचा नाव घेताच तोंडाला पाणी सुटते. त्याची गोड चव त्याला वेगळं बनवते. स्वीट कॉर्नचा वापर मुख्यत पीठ म्हणून, सूपमध्ये, स्नॅक्स म्हणून किंवा टॉपिंग साठी केला जातो. पण तुम्हाला हिवाळ्यात स्वीट कॉर्न सूप पिण्याचे फायदे माहिती आहेत का? स्वीट कॉर्नमध्ये(Sweet Corn Soup Benefits) व्हिटॅमिन ए, बी, ई, खनिजे आणि अॅन्ट्रीऑक्सिडेंट मिळते. त्याशिवाय त्यामध्ये उपलब्ध फायबर्स पचनक्रिया सुधारते आणि फाईटोकेमिकल्स कित्येक प्रकारचे आजारांपासून वाचविण्याचे काम करतात. हिवाळ्यात कॉर्न सूप प्यायल्याने इम्युनिटी वाढते आणि वजन नियंत्रित करू शकता. चला जाणून घेऊ या स्वीट कॉर्न सूपचे फायदे

स्वीट कॉर्न सूप
पियो ग्लासफुल सूप...

स्वीट कॉर्न सूप पिण्याचे फायदे (Sweet Corn Soup Health Benefits)

१.मधुमेह

स्वीट कॉर्नमध्ये व्हिटॅमिन असते जे शरीरामध्ये प्रोटीन, लिपीड आणि कार्बोहाड्रेट मेटाबॉलिज्म रेग्युलेट करण्यासाठी मदत करतात. स्वीट कॉर्न सूपचे सेवन केल्यास मधूमेह निंयत्रित केला जाऊ शकतो. स्वीट कॉर्न सूपच्या सेवनामुळे मधुमेह कंट्रोल केला जाऊ शकतो

२.लठ्ठपणा

स्वीट कॉर्नमध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आपल्या डाएटमध्ये स्वीट कॉर्न सूपचा समावेश केला जातो.

स्वीट कॉर्न सूप
कहर...! फायर पाणीपुरीनंतर चर्चा 'आइसक्रीम पाणीपुरी'ची....

३. ह्रदय :

ह्रदयाला निरोगी राखण्यासाठी स्वीट कॉर्न सूप फायदेशीर ठरते. खरतर यामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिज असते जे ह्रदयासंबधीत समस्यांची जोखीम कमी करू शकते.

४. पचन :

स्वीट कॉर्नमुळे पचनक्रिया सुधारते. त्यामध्ये फायबरचे भरपूर चांगला सोर्स मानले जाते. स्वीट कॉर्नच्या सेवनामुळे बद्धकोष्ठता, गॅस, ऍसिडिटीची समस्या दूर केला जाऊ शकतो.

स्वीट कॉर्न सूप
Black Detox Idli Video : हाईट झाली! बाजारात 'काळी इडली' आली!

५. डोळे

स्वीट कॉर्नमध्ये व्हिटॅमिन आणि अॅन्टीऑक्सिडेंट मिळते, जे डोळ्यांसाठी चांगले असते. स्वीट कॉर्न सूपच्या डाएटमध्ये समावेश करून डोळ्यांची दृष्टी सुधारू शकते.

६ स्किन :

स्वीट कॉर्न सूपच्या सेवनामुळे त्वचा तेजस्वी आणि ताजीतवानी राहते. स्वीट कॉर्नमध्ये असे काही तत्व असतात जे त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com