

Beet Kabuli Chana Tikki Recipe
sakal
सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो. त्यामुळे दिवसाची सुरुवात पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त पदार्थांनी करणे गरजेचे आहे. जर तुम्ही रोजच्या पोहे-उपमाला पर्याय शोधत असाल, तर बीट-काबुली चणा टिक्की हा एक उत्तम आणि चविष्ट पर्याय ठरू शकतो. काबुली चणे, बीट आणि ओट्सपासून तयार होणारी ही टिक्की प्रोटीन, फायबर आणि आवश्यक पोषक घटकांनी भरलेली असल्याने दीर्घकाळ पोट भरल्याची भावना देते आणि शरीराला दिवसभर ऊर्जा मिळण्यास मदत करते. चला तर मग, जाणून घेऊया या हेल्दी ब्रेकफास्टची सोपी रेसिपी.