

Weekend Breakfast Special: Easy Paneer Beetroot Paratha Recipe
sakal
Healthy Weekend Breakfast Ideas: सकाळच्या नाश्त्यात रोज तेच पोहे, उपमा किंवा पराठे खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी काहीतरी रंगीत, टेस्टी आणि हेल्दी ट्राय करा. बीटरूट आणि पनीरपासून तयार होणारा हा स्टफ्ड पराठा चवीसोबतच शरीरालाही भरपूर पोषण देतो. बीटरूटमधील आयर्न आणि फायबर तर पनीरमधील प्रोटीन शरीराला दिवसभर एनर्जी देण्यास मदत करतं. खास म्हणजे हा पराठा दिसायलाही आकर्षक असल्यामुळे मुलांनाही खूप आवडू शकतो. कमी वेळात तयार होणारी ही हेल्दी रेसिपी नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट ठरू शकते.