esakal | गरमीच्या दिवसात बेल फळाचे सरबत प्या आणि ताजेतवाने रहा; जाणून घ्या रेसिपी

बोलून बातमी शोधा

गरमीच्या दिवसात बेल फळाचे सरबत प्या आणि ताजेतवाने रहा; जाणून घ्या रेसिपी

गरमीच्या दिवसात बेल फळाचे सरबत प्या आणि ताजेतवाने रहा; जाणून घ्या रेसिपी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गरमीच्या दिवसात शरीर तरोताजा ठेवण्यासाठी अनेक साधनांचा तसेच ड्रिंकचा वापर केला जातो. यामध्ये समावेश होतो तो बेल सरबतचा. गरमीच्या मौसममध्ये हा बाजारात सहजरित्या मिळून जातो. काही लोक याला बाहेरून खरेदी करून आणतात. परंतु याला घरी बनवणे सोपे आहे. याला घरी बनवायचा असल्यास खूप सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला घरी कधीच ट्राय केला नसेल तर ही सरबत बनवण्याची रेसिपी नक्की ट्राय करा..

बनवण्याची पद्धत -

सुरुवातीला लाटण्याच्या मदतीने बेलाचे फळ तोडून वेगळे करा. याच्या साली काढून फेकून देण्यात आधी याला लागलेल्या चीकच्या मदतीने काढून घ्या. आता या मधील बिया बाजूला करा. कधीकधी बेलाच्या फळांचा आजूबाजूला बराच चिक किंवा जेल लागलेले असते. जे कडू असते. याला जर दूर केले नाही, तर सरबत कडू होतो. यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये या फळाला बारीक करून घ्या. आणि यामध्ये पाणी घाला. हे मिश्रण उत्तम प्रकारे एकत्र होऊ द्या. आणि यामध्ये असलेल्या बिया बाजूला करा. एका मोठ्या भांड्यात मिश्रण वाटून घ्या. आणि त्यामध्ये थोडे पाणी घाला. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये साखर घालू शकता. परंतु बेलाचे फळ हे कधीकधी गोड असतात. परंतु पाणी घातल्यानंतर याचा गोडपणा थोडा कमी होऊ शकतो. यासाठी तुम्ही साखरही वापरू शकता. आता एका ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे, पुदिन्याची पाने, चिमूटभर मीठ घालून तुम्ही देऊ शकता.