esakal | हेल्दी टेस्टी पदार्थ खायचा असेल तर घरीच बनवा आंबट गोड कारल्याची भाजी; सोपी रेसिपी

बोलून बातमी शोधा

हेल्दी टेस्टी पदार्थ खायचा असेल तर घरीच बनवा आंबट गोड कारल्याची भाजी; सोपी रेसिपी
हेल्दी टेस्टी पदार्थ खायचा असेल तर घरीच बनवा आंबट गोड कारल्याची भाजी; सोपी रेसिपी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : डायनिंग टेबलवर कारल्याची भाजी पाहिल्यानंतर अनेकजण नाक मुरडतात. आपल्यापैकी बरेच लोकांनी कधीच कारल्याची टेस्टही घेतली नसेल. किंवा त्याला स्पर्शही केला नसेल. आपण याचा कडूपणा स्वीकारायला तयार होत नाही परंतु त्याचे हे गुणवैशिष्ट्य आपल्या शरीरासाठी सर्वोत्तम आहेत. त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट स्वीकारावी लागेल की हे आरोग्यासाठी लाभदायक आहे. यामध्ये अॅंटीऑक्सिडेंट, फायबर, विटामिनचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे आपले रक्त शुद्ध होते आणि डोळ्यांची रोशनी उत्तम राहण्यास मदत होते. याच्यामुळे इम्युनिटी पॉवर तर वाढतेच, शिवाय त्वचेत स्वास्थ्य उत्तम राहण्यास कारल्याची मदत होते.

प्रत्येक भारतीय किचनमध्ये कारल्याचे अस्तित्व पाहायला मिळते. जर तुम्हाला याला शिजवण्याची एखादी पद्धत माहीत असेल, जी याचा कडूपणा दूर करेल आणि काढल्यानंतर याचे आकर्षण वाढेल. अशी रेसिपी तुम्ही बनवू शकता. यामध्ये तुम्हाला इतकच करायचा आहे. कारण यामधील बिया बाजूला करून त्याला मिठासोबत उकाळायचं आहे आणि यातील एक्स्ट्रा पाणी काढून यामध्ये मसाले घालून एक स्वादिष्ट रेसिपी तयार होऊ शकते

आम्ही तुमच्यासाठी कारल्याची अशी एक रेसिपी घेऊन आलो आहोत, जी कारल्याचा कडूपणा कमी करून आंबट गोड पद्धतीने तुम्हाला याचा आस्वाद घेऊ देईल. मसाले आणि उकळलेल्या कारल्याच्या स्वादामुळे तुम्ही याला पसंती देऊ शकता. हा पदार्थ तुम्ही आमटी, चपाती, भाकरी यांच्यासोबत घेऊ शकता. यामध्ये तुम्ही कोथिंबीरीचा वापर केल्याने तुम्हाला याचा आस्वाद चाखता येतो.

बनवण्याची पद्धत -

कारल्याचा दोन्ही बाजू चिरून त्याला दोन आकारांमध्ये कट करा. यानंतर त्यातील बिया एका बाजूला करा. आता कारल्याचे छोटे छोटे तुकडे करा. याला मीठ आणि हळदीसोबत उकळून घ्या. सात ते आठ मिनिट उकळल्यानंतर यातील पाणी बाजूला करा. आता या कारल्याला स्वच्छ धुऊन घ्या. आणि यामध्ये असलेले एक्सट्राचे पाणी बाजूला करा. आता एका पॅनमध्ये तीन टेबलस्पून तेल घाला. त्यामध्ये जिरे टाका. त्यानंतर कारले टाका आणि चवीनुसार मीठ घालून त्याला मंद आचेवर काही वेळ भाजून घ्या. यानंतर यामध्ये धने पावडर, सोपच्या बिया, लाल तिखट पावडर हे पदार्थ घालून मिश्रण एकत्र करा. त्यानंतर यामध्ये पाणी घालून झाकण ठेवा. आणि हे उकळू द्या. शेवटी यामध्ये साखर घालून काही मिनिटांसाठी शिजवून घ्या. चवीला आंबट-गोड लागणारे चविष्ट कारल्याची रेसिपी तयार आहे.