esakal | काही मिनिटांत घरीच बनवा मोहब्बत सरबत; जाणून घ्या सोपी रेसिपी

बोलून बातमी शोधा

काही मिनिटांत घरीच बनवा मोहब्बत सरबत; जाणून घ्या सोपी रेसिपी

काही मिनिटांत घरीच बनवा मोहब्बत सरबत; जाणून घ्या सोपी रेसिपी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गरमीच्या दिवसात थंड पेयांचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले असते. भारतामध्ये साधारणत: लिंबू सोडा पासून ते ताक, लस्सी, लिंबूपाणी असे काही मिनिटांत तयार होणारे पेयांचे सेवन केले जाते. यांचे सेवन केल्याने गरमीपासून कमी अधिक प्रमाणात आराम मिळायला मदत होते. हे पेय साधारणतः दही बेस्ड असतात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का, की अनेक फळांपासून तुम्ही ज्यूस किंवा ड्रिंक्स तयार करू शकता. असेच एक लोकप्रिय फळ म्हणजे कलिंगड. या हंगामामध्ये उपलब्ध असते आणि ज्याला लोक अधिक पसंती देतात. कलिंगड खाण्यासाठी तर उपयोगी पडतेच शिवाय तुम्ही यापासून रिफ्रेशिंग ड्रिंक्स बनवू शकता. आणि त्यालाच मोहब्बत शरबत असे म्हटंले जाते.

मोहब्बत का शरबत हे एक फेमस ड्रिंक आहे. ज्याचा उपयोग गरमीच्या दिवसात अधिक प्रमाणात केला जातो. गुलाबी रंगाचे दिसणारे हे ड्रिंक जितकं सुंदर दिसतं तितकं ते पिण्यासाठी स्वादिष्ट आहे. हे बनवणे अगदी सोपे आहे. रोज सिरप, दूध, कलिंगडचे छोटे छोटे तुकडे याचा स्वाद वाढवण्याचं काम करतात. काही मिनिटांत तयार होणारे ड्रिंक आहे. गरमीच्या दिवसात तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांसाठी सुद्धा हे देऊ शकता. तसेच तुम्ही कोणत्याही सणाच्या दिवशी हे ड्रिंक बनवू शकता. जसे की आपल्याला माहीत आहे या दिवसात सध्या रमजान महिना सुरू आहे. यादरम्यान याचे सेवन तुम्ही करू शकता.

कसा बनवाल मोहब्बत सरबत

  • सर्वात आधी कलिंगडच्या तुकड्यांना छोट्या आकारात कापून घ्या.

  • त्यानंतर बाउलमध्ये एक कप दूध घ्या आणि यामध्ये रोज सिरप आणि बर्फाचे काही तुकडे टाका.

  • आता या मिश्रणात टाकून ते उत्तमरीत्या एकत्र करून घ्या.

  • थंडगार असा मोहब्बत शरबत तयार आहे.