esakal | दुपारच्या नाश्तासाठीट्राय करा पोटॅटो पिझ्झा बाईट्स; सोपी रेसिपी

बोलून बातमी शोधा

दुपारच्या नाश्तासाठी ट्राय करा पोटॅटो पिझ्झा बाईट्स; सोपी रेसिपी
दुपारच्या नाश्तासाठी ट्राय करा पोटॅटो पिझ्झा बाईट्स; सोपी रेसिपी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : बटाटा एक आवश्यक फळभाजी आहे. सर्वसाधारणपणे हा आपल्याला पोर्तुगीजांकडून दिला गेला आहे. तेव्हापासून याचा सर्रास वापर आपल्याकडे होतो. आता आपली याच्यावर इतकी अवलंबता वाढली आहे की, त्याच्याशिवाय आपण एकही दिवस घालवू शकत नाही. बटाट्याचा वापर अनेक प्रकारचे स्नॅक्स बनविण्यासाठी केला जातो. यात सर्वात सोपी रेसिपी म्हणजे कोणत्याही वेळी फ्राय करून खाऊ शकता. तसेच ज्याला स्टोरही करू शकता. चला तर मग ही रेसिपी पाहूयात..

कृती -

काही मोठे बटाटे उकडून, सोलून घ्या. त्याना पूर्णपणे थंड होऊ द्या. यानंतर बटाट्याला किसून घ्या आणि यातील थोडे बाजूला काढून ठेवा. काळी मिरची पावडर, लाल तिखट, मीठ, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला हे पदार्थ यामध्ये घाला. त्यानंतर यामध्ये चीज घाला किंवा तुम्ही चीज बाईट्सचाही वापर करू शकता. यानंतर चिरलेली कोथिंबीर आणि मैदा घालून याचे पीठ बनवून घ्या. हे सगळे पीठ मळून घ्या. या पिठापासुन लाटण्याच्या सहाय्याने मोठे रोलप्रमाणे लाटून घ्या. त्यानंतर हे गोळे छोटे छोटे बाईटमध्ये कट करून घ्या. जर तुम्हाला काही दिवसांसाठी स्टोअर करणार असाल तर एका एअर टाइट कंटेनरमध्ये स्टोअर करु शकता. जर हे तुम्हाला तात्काळ खायचे असल्यास तुम्ही मंद आचेवर डीप फ्राय करून ही डीश सर्व्ह करू शकता.