esakal | घरीच बनवा हॉटेलस्टाईलचा बिर्याणी रायता; खास टिप्स
sakal

बोलून बातमी शोधा

घरीच बनवा हॉटेलस्टाईलचा बिर्याणी रायता; खास टिप्स

घरीच बनवा हॉटेलस्टाईलचा बिर्याणी रायता; खास टिप्स

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : काही विशेष पदार्थांचा आपण विचार करायला लागलो तर त्यात बिर्याणीचाही समावेश होतो. तांदळापासून बनवलेली ही रेसिपी मुळची भारतीय नाही. परंतु ज्या पद्धतीने तिला भारतात पसंती दिली जाते, किंवा बनवले जाते हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. हैदराबादी बिर्याणीपासून ते कोलकत्ता बिर्याणी अगदी लखनऊ बिर्याणीपर्यंत सर्व प्रकार देशात बनवले जातात. बिर्याणी ही साधारणपणे भाताच्या डिशचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये मांसाहार आणि मसाल्यांचा एकत्रित मिश्रण असते. कुकरमध्ये थर लावून किंवा मातीच्या भांड्यात याला बनवले जाते.

चिकन आणि तांदळाला वेगवेगळे शिजवून त्यानंतर या दोघांना एकत्र शिजवले जाते. परंतु असे असले तरी बिर्याणीची स्टाईल कोणतीही असली तरी काही खास फरक पडत नाही. परंतु त्यासोबत रायता असल्याशिवाय त्याची चव वाढत नाही. खूप आधीपासून रायता आणि बिर्याणी हे जोडीच्या डिशला पसंदी दिली जाते. रायता एक स्पेशल डिश आहे. दही आणि फ्रेश भाजी मसाले यांचे मिश्रणासोबत बनवले जाते. बिर्याणीचा गरमपणा कमी करण्यासाठी रायत्याची मदत होते. बनवलेला रायत्यामध्ये कोणताही संबंधित पदार्थ तुम्ही मिक्स करू शकता. योग्य मात्रामध्ये फळभाज्या घातल्यास याचा स्वाद उत्तम होतो.

हॉटेल स्टाईल रायता रेसिपी

मध्यम आकारामध्ये कांदा घेऊन त्याला बारीक कट करा. कांद्याला एका बाउलमध्ये ठेवा. टोमॅटो बारीक चिरून घ्या. आता एका बाऊल मध्ये टोमॅटो, किसलेलं गाजर, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची, भाजलेल्या जिऱ्याची पावडर हे पदार्थ एकत्र करा. यामध्ये थोडीशी साखर घाला. आणि याला घट्टपणा आणण्यासाठी शेवटी यामध्ये फेटलेले फ्रेश दही घाला. हे पदार्थ एकत्र करून तुमचा चविष्ट रायता तयार होईल.

loading image
go to top