esakal | आजचा रंग केशरी : पपई - आरोग्यासाठी लाभदायी
sakal

बोलून बातमी शोधा

आजचा रंग केशरी : पपई - आरोग्यासाठी लाभदायी

आजचा रंग केशरी : पपई - आरोग्यासाठी लाभदायी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

- संजीव वेलणकर

पपईचे शास्त्रीय नाव कॅरिका पपया असे आहे. पपईचे फळ मूळचे भारतीय नाही. दक्षिण मॅक्सिको, मध्य अमेरिका आणि ब्राझीलमध्ये प्रामुख्याने आढळणारे हे फळ आता जगभरात उपलब्ध आहे. यालाच ’paw paw’ किंवा ’melon tree' असेही म्हणतात. पोर्तुगिजांबरोबर पपई भारतात आली. पोर्तुगीज भाषेत याला ’pepita' म्हणतात. त्यावरून ‘पपीता’ व ‘पपई’ ही नावे पडली. संस्कृतमध्ये याला ‘एरण्डकर्कटी’ असे म्हणतात. पपईचे पान एरंडाच्या पानासदृश आहे. एरंडाच्या पानाला पाच टोके असतात, तर पपईला सात टोके असतात. मॅक्सिकोमधील एक जमात ‘मयन’ आहे. ही जमात पपईच्या झाडाचे पूजन करते. त्याला देव मानते. (याला ‘Tree of life' असे मानते.) कोलंबस जेव्हा विश्र्वभ्रमंती करता-करता मध्य अमेरिकेला पोहोचला, तेथे त्याने पपईचा आस्वाद घेतला. याला त्याने ’fruit of angels' असे नाव दिले. अशी ही पपई त्याच्या आवडत्या फळांपैकी एक होती. पपईच्या विविध भागांचे विविध औषधी गुणधर्म आहेत. याचे कच्चे फळ, पिकलेले फळ, मूळ, खोड, बिया, फळाचे साल, पाने आणि चीक सर्वांचे औषधी उपयोग आहेत. पपई पिकताना ही पिवळसर केशरी रंगाची होते. वरील साल हे मऊ व पातळ असते, तर आतील गर हा केशर आंब्याप्रमाणे शेंदरी रंगाचा असतो व पूर्ण पिकल्यावर खाताना सहज विरघळतो. पपईच्या बिया या काळ्या मिरीसारख्या असतात. पपई पासून जाम, आइसक्रीम, टुटीफ्रुटी, चॉकलेट्स, जेली, सौंदर्यप्रसाधने असे अनेक प्रकार बनवले जातात.

loading image
go to top