esakal | टेस्टी आणि हेल्दी ऑईल फ्री पालक पकोड्याची झटपट रेसिपी पाहाच
sakal

बोलून बातमी शोधा

टेस्टी आणि हेल्दी ऑईल फ्री पालक पकोड्याची झटपट रेसिपी पाहाच

टेस्टी आणि हेल्दी ऑईल फ्री पालक पकोड्याची झटपट रेसिपी पाहाच

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

जेव्हा पाऊस पडतो तेव्हा प्रत्येकाला चटपटा काहीतरी खायची इच्छा होते. आणि तोंडाला पाणी सुटून पकोडे खाण्याची इच्छा होते. त्यातील पकोडा हा एक लोकप्रिय भारतीय स्नॅक्स. जे स्वादिष्ट आणि तितकेच चवदार असतात. चला तर मग त्यातीलच एक पालक पकोडा बनवण्याची रेसिपी पाहूयात.

हेही वाचा: चटपटीत चवीचे गोबी धपाटे कसे बनवावे? जाणून घ्या रेसिपी

साहित्य :

3/4 कप पालक, 5-6 चमचे बेसन, १ टेस्पून रवा, एक चिमूट हिंग, १ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट, १/२ टीस्पून जिरेपूड, मीठ चवीनुसार, १ / ४ टीस्पून ओवा

हेही वाचा: ब्रेकफास्टसाठी झटपट तयार होणारे फ्लॉवर पराठे; जाणून घ्या रेसिपी

कृती :

- पालक पकोडे तयार करण्यासाठी सुरवातीला बेसन चाळून घ्या.

- एका बाऊलमध्ये पालक, बेसन पीठ, रवा, हिंग, हळद, लाल तिखट, जिरेपूड, मीठ आणि ओवा मिक्स करा

- त्या पिठात थोडेसे पाणी घाला आणि सर्व मिश्रण मिसळा. पिठ फार जाड किंवा पातळ नसावे.

- ओव्हन 220 डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम करावे आणि बेकिंग शीटवर लहान लहान गोळे ठेवा. नंतर साधारण 25 मिनिटांकरिता ओव्हन किंवा एअर फ्रिअरमध्ये बेक करा.

- अशा पद्धतीने पालक पकोडा तयार झाला

- आणि कोथिंबीर-पुदिना चटणी किंवा टोमॅटो-कांदा चटणीबरोबर पालक पकोडा सर्व्ह करा.

loading image
go to top