esakal | माझी रेसिपी : फणसखंड
sakal

बोलून बातमी शोधा

फणसखंड

माझी रेसिपी : फणसखंड

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

प्रतिभा जामदार, मुंबई

साहित्य- 1 लिटर सायीचे दूध, पाव किलो साखर. पाव किलो फणसाचा रस (साठवून ठेवलेला), वेलची पावडर 2 चमचे

कृती-

प्रथम दूध तापवून कोमट करून घ्यावे, त्यामध्ये 1 चमचा दही लावून (विरजण) दही तयार करून घ्यावे.

दही पातळ मलमल च्या फडक्यात बांधून 8-10 तास ठेवून चक्का तयार करून घ्यावा.

साखर दळून पिठीसाखर तयार करून घ्यावी.

पिठीसाखर, चक्का, फणसाचा रस आणि वेलदोडा पूड एकत्र करून घ्यावे. मिश्रण चाळणीवर घेऊन वाटीने किंवा डावाने दाबून फिरवत चाळणीमधून गाळून घ्यावे. चक्क्यामध्ये असलेल्या गुठळ्या मोडल्या जाऊन एकदम मऊसूद लोण्यासारखे फणसखंड तयार होते.

फणसाच्या आगळ्या वेगळ्या चवीचे हे श्रीखंड अतिशय सुरेख लागते.

टीप- फणसाचा रस सिझन मध्ये काढून गाळून डब्यामध्ये भरून फ्रिजर मध्ये ठेवून द्यावा. वर्षभर टिकतो.

loading image
go to top