Fitness Freak Faral : दिवाळीला फिटनेस जपायचाय, खा Baked चकली

Fitness Freak Faral : दिवाळीला फिटनेस जपायचाय, खा Baked चकली

दिवाळीला घरोघरी चकली हमखास केली जाते. चकली केल्यावर 2-4 दिवसात त्याचा फडशा पडतो.पण भरपूर तेलकट, तूपकट खाऊन तुमचे वजनही नंतर वाढते. त्यामुळे अशा तळलेल्या चकल्या खाणे टाळलेले बरे. पण तुम्हाला दिवाळीत चकली न खाता राहणे कठीण जात असेल तर मात्र बेक चकलीचा विचार करावा लागेल. ती खाऊन तुम्ही हेल्दी राहू शकता.

साहित्य- तांदळाचे पीठ - 1 कप, लो फॅट दही- 1/2 कप, तीळ - 2 टीस्पून मिरची पावडर - 1 टीस्पून, तेल - 1 टीस्पून, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ.

कृती- एका मोठ्या बाउलमध्ये सर्व साहित्य एकत्र करून थोडेसे मऊ मळून घ्या. बेकिंग ट्रेला बेकिंग पेपर लावून त्यावर तेल लावून व्यवस्थित तेल सगळीकडे पसरवून घ्या. मळलेले पीठ चकलीपात्रात घालून ग्रीस केलेल्या बेकिंग पेपरवर चकल्या पाडून घ्या. या चकल्या प्री हिट केलेल्या ओव्हनमध्ये 180°c वर सुमारे 20 ते 25 मिनिटे सोनेरी होईपर्यंत बेक करा. चकल्या थंड झाल्यावर गरम गरम चहाबरोबर तुम्ही या चकल्यांचा आस्वाद घेऊ शकता.

Fitness Freak Faral : दिवाळीला फिटनेस जपायचाय, खा Baked चकली
Fitness Freak Faral : दिवाळीत बनवा डायट स्पेशल ड्रायफ्रूट्स लाडू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com