Mon, March 20, 2023

मसालेदार आंबोळी
Published on : 16 February 2023, 2:57 am
साहित्य ः १ किलो तांदूळ, २०० ग्रॅम उडदाची डाळ, तीन चमचे जिरेपूड, १ चमचा मेथ्या (हे सर्व जिन्नस भाजून त्याचे पीठ करून ठेवावे) चवीनुसार हळद, मीठ व तेल
कृती ः आवश्यक तेवढे पीठ घेऊन त्यात हळद, मीठ घालून पाण्यात कालवून घ्या. तव्यावर तेल पसरून पळीने पीठ घालून आंबोळी करावी. एकाच बाजूने भाजून घ्यावे. ही आंबोळी बटाट्याच्या भाजीबरोबर किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर छान लागते.