esakal | उकडलेल्या अंड्यांपासून बनवा 'या' तीन खास रेसिपीज

बोलून बातमी शोधा

Boil Eggs Recipes In Marathi

जर तुम्हाला अंडे खायला आवडत असेल तर उकडलेल्या अंड्यांपासून बनवलेल्या या तीन रेसिपीज् नक्कीच बनवा.

उकडलेल्या अंड्यांपासून बनवा 'या' तीन खास रेसिपीज
sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : अंडे खाणाऱ्या लोकांना प्रोटीन्सची कमतरता नसते. तसेच ते आरोग्यासाठी किती गुणकारी असते हे सांगण्याची गरज नाही. तुम्हाला माहित आहे का उकडलेल्या अंड्यांपासून किती प्रकारच्या रेसिपीज् बनवल्या जाऊ शकतात. आम्ही तुम्हाला तीन सर्वोत्तम रेसिपीज् विषयी सांगणार आहोत, जे उकडलेल्या अंड्यांपासून बनवले जातात...

१.अंडा मसाला 
तुम्ही अंडा करी अनेकदा खाली असेल. मात्र अंडा मसाला कधी खाल्ला आहे का? 

साहित्य
---
मसाला पेस्टसाठी 
- एक छोटा चमचा लाल मिरची पावडर
- एक छोटा चमचा हळदी पावडर
- चवीनुसार मीठ
- एक छोटा चमचा धन्याचे पावडर
- एक छोटा चमचा जीरा पावडर
- दोन छोटे चमचे आद्रक, लसूणची पेस्ट 

अंडे
- चार उकडलेले अंडे
- तळण्यासाठी तेल

बेस बनवण्यासाठी 
- एक चमचा तेल
- एक चमचा जीरा
- एक हिरवी मिरची
- चिमूटभर हिंग
- एकेक चमचा लसूण, आद्रक (कापलेले)
- एकेक छोटा चमचा हळदी पावडर, धने  व जीरा पावडर
- चवीनुसार लाल मिरचीचे पावडर आणि मीठ
- दोन कापलेले टोमॅटो
- एक  छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर
-१/२ लिंबांचा रस 

तडक्यासाठी - काश्मीरी लाल मिरची, जीरा, राई, कढीपत्ता, मेथीची दाणे एकत्र करुन साधारण तडका द्यायचा आहे.

कृती
----
- सर्व साहित्याचे मिश्रण करुन उकडलेले अंडे कापून घ्या.
- आता ती तळून घ्या. किचन टिश्यूमध्ये तेल शोषून घेतल्यानंतर अंडे पुन्हा अर्ध्या अर्ध्या भागात कापून घ्या.
- एका पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात हिरवी मिरची, हिंग, कांदा, आद्रक आणि लसूण टाका.
- जोपर्यंत कांदा लाल होत नाही, तोपर्यंत मसाले टाकू नका. नंतर मसाले टाकून ३०-४० सेकंदांपर्यंत शिजवा.
- आता टोमॅटो टाकून साॅफ्ट होऊन त्यातून तेल येईपर्यंत शिजवा. आता तुम्हाला तळलेले अंडे त्यात टाकायचे आहे.  ती चांगल्या प्रकारे मसाल्यात एकत्र करुन घ्या.
- एका पॅनमध्ये तेल, काश्मीरी मिरची, मेथी, जीरा, सरसो, कढीपत्ता आदी टाकून तडका द्या आणि अंडा मसाल्यावर टाका
- अंडा मसाला खाण्यासाठी तयार


२. डेव्हिड अंडे
ही एका इटालियन रेसिपीज् आहे. 

साहित्य
--- 
- चार उकडलेले अंडे (ती थंड करा) 
- चवीनुसार मीठ
- १/२ छोटा चमचा काळी मिरची पावडर
-१/२ छोटा चमचा सरसो पावडर
- १ चमचा दूध किंवा मेयोनीज
- १ चमचा कोथिंबीर
- सर्व करण्यासाठी सलाड पाने 

कृती
---
- उकडलेले अंडे उभ्या आकारात कापा
- आता त्यातील बलक काढून त्यात इतर साहित्य टाका. मिक्सरमध्ये हे करुन घ्या.
- आता अंड्यांचा पांढरा भाग एका प्लेटमध्ये ठेवा.
- त्यानंतर मधोमध योकचे मिक्स्चर टाका आणि ते सजावून घ्या. तुम्ही त्यात दुसराही घटक टाकू शकता.
- थंड करा आणि खायला तयार

३.नर्गिसी कोफ्ता रेसिपी
जर तुम्ही मांसाहर करत असाल विशेषतः मटण खात असाल तर ही रेसिपी खूप स्वादिष्ट लागेल. तसेच ती चिकनबरोबरही बनवली जाऊ शकते.

साहित्य
--- 
- १/२ किलो खिमा बनवलेले मटण
- दोन कांदे ( मोठ्या भागात कापलेले)
- दोन कापलेले कांदे
- दोन टोमॅटो
- ४-५ हिरवी मिरची
- ५-६ कळ्या लसूण 
- एक मोठा चमचा बारीक केलेला आद्रक
- ३ छोटा चमचा लाल मिरची पावडर
- एक छोटा चमचा गरम मसाला 
- एक छोटा चमचा धनिया पावडर
- दोन चमचे दही
- एक अंडा फेंटा 
-चार उकडलेले अंडे
- तेल आणि मीठ गरजेनुसार 

कृती
- प्रथम खिमा बनवलेल्या मटणाला २० मिनिटांपर्यंत मोठ्या आकारात कापलेले कांदे, हिरवी मिरची, आद्रक, लवंगाबरोबर शिजवा.
- जेव्हा हे शिजेल तेव्हा त्यात एक अंडा फोडून टाका.
- आता उकडलेले अंडे मटणाबरोबर चांगल्या प्रकार एकत्र करुन घ्या.
- ती तळा आणि पुन्हा किचन टिश्यूवर काढा.
- येथे तुम्ही ते भाताबरोबर या कोफ्ता घेऊन बिर्याणी बनवू शकता किंवा पुन्हा ग्रेव्हीबरोबर ते बनवू शकता. 

संपादन - गणेश पिटेकर