Sabudana Halwa Recipe: 'अशी' करा साबूदाण्याची चविष्ट खीर; माहित करून घ्या कृती

sabudana khir
sabudana khir

औरंगाबाद: Sabudana Halwa Recipe: नाश्तामध्ये तुम्ही अनेक प्रकारचा हलवा बनवला असेल आणि खाल्ला असेल. पण यावेळी साबूदाण्याची खीर किंवा हलवा कसा बनवायचा ते आपण पाहूया. कमी वेळात चवदार हलवा बनवायचा असेल तर साबूदाण्याचा हलवा एक चांगला पर्याय आहे. हे खायलाही खूप चवदार लागते आणि ते अगदी सहज बनवता येते. मुलेही मोठ्या उत्साहाने ते खातात.

साबूची खीर बनवण्यासाठी साहित्य-
साबूदाणा - 1 कप
साखर - 1/2 कप
केशराचे धागे- 1 चमचा दुधात भिजलेले
देशी तूप - 4 चमचे
इलायची - 4 बारिक केलेल्या
बदाम चिरलेले - 10
काजू चिरलेले -10

साबुदाण्याची खीर तयार करण्याची पद्धत-
साबूची खीर बनवण्यासाठी प्रथम साबूदाणे स्वच्छ करून घ्या. यासाठी, एक कप साबुदाणा पाण्याने धुवा आणि सुमारे एक तास पाण्यात भिजवा. थोड्या वेळाने साबुदाण्यांतील पाणी फेकून द्या. यानंतर नॉन स्टिक पॅनमध्ये चार चमचे देशी तूप घाला आणि ते वितळवा. यानंतर त्यात भिजलेला साबुदाणा घाला आणि चमच्याने ढवळून तळून घ्या.

जेव्हा साबुदाणा चांगला भाजला जाईल तेव्हा साधारण २ कप पाणी घालून ते चमच्याने ढवळवा आणि शिजवा. साबू चांगला शिजल्यावर त्यात केशर आणि अर्धा कप साखर घाला. साखर साबुदाणामध्ये पूर्णपणे मिसळून होईपर्यंत चमच्याने ढवळून घ्या. हलव्यामध्ये साखर पूर्णपणे विरघळली की त्यात चिरलेली बदाम, काजू आणि वेलची पूड घाला, चांगले एकत्र करून शिजवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com