कमी वेळात आणि सहजपणे घरीच बनवा रगडा चाट; माहिती करून घ्या कृती

ragada chhat
ragada chhat
Updated on

औरंगाबाद: चाटचं नाव काढताच बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी आलं असेल. बरेच जण मसालेदार आणि चटपटी जेवणाचे शौकीन असतात. त्यामुळेच स्ट्रीट फूडमध्ये तुम्हाला चाटचे विविध प्रकार दिसतील. यामध्ये आलू चाट, पापडी चाट, दही भल्ला चाट आणि आलू टिक्की हे सर्वाधिक प्रसिध्द आहेत. यामध्ये कुणाला विचारलं की यातलं आवडतं चाट कोणतं, तर ते सांगणं तसंच कठीणच आहे.

वरील चाटचे प्रकार सोडता वेगवेगळ्या शहरांत तिथले चाटचे विविध प्रकार आहेत. यासारखाच रगडा चाटही प्रसिध्द असणारा चाट आहे. त्याच्या चवीमुळे या चाटचे खवय्यै चाहते अनेक मिळतील. रगडा चाट बनवताना यामध्ये मटर टाकलं जातं ज्याला वातानाही म्हटलं जातं. उकळून घेतलेल्या मटरसोबत कांदा, टोमॅटो, चटनी आणि मसाले टाकून हा चाट अजून उत्तम बनवला जातो. 

हा चाट अजून चवदार बनवण्यासाठी यूट्यूबर शेफ पारूल यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर हा रगडा चाट बनवण्याची कृती सांगितली आहे.  ही सर्व माहिती त्या व्हिडीओत दिली आहे. त्यामुळे या माहितीद्वारे तुम्ही घरात हा रगडा चाट बनवू शकता.

घरी कसा बनवाल रगडा चाट-
1. एक कप मटर धुवून रात्रभर भिजू घाला.

2. भीजलेले मटर काढून त्यांना प्रेशर कुकरमध्ये 2 कप पाणी घालून लावावे. थोडंसं मिठ टाकून  3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या.

3. दुसरीकडे कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, आले लसूण, टोमॅटो आणि मसाले घालून चांगले फ्राय करुन घ्या

4. आता तयार मसाल्यात उकडलेले वाटाणे घाला आणि 2 मिनिटे शिजवा आणि गॅस बंद करा.

5. त्यानंतर चटणी, कोरडी आले, दही, पापडी, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, चाट मसाला आणि इतर मसाले घालून चाट एकत्र करा.

6. त्यानंतर तुमचा रगड चाट तयार झाला मग तो सर्व्ह करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com