घरीच बनवा मँगो कुल्पी, जाणून घ्या रेसिपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mango Kulfi

घरीच बनवा मँगो कुल्फी, जाणून घ्या रेसिपी

सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरु आहे. या ऋतूत बरेच जणांचा थंड पेय किंवा पदार्थ खाण्यावर जोर असतो. या काळात वेगवेगळे आइसक्रिम, फालूदा आणि कुल्फी खाल्या जातात. तसेच उन्हाळ्यात अजून एक फळ जास्त प्रमाणात खाल्ला जातो, तो म्हणजे आंबा. सध्या आंब्याची कुल्पीही बरीच प्रसिद्ध आहे. चला तर जाणून घेऊया आंबा फ्लेवर असणारी कुल्फी कशी तयार करायची...

step 1

step 1

आंब्याची कुल्फीची रेसिपी आपण काही मिनीटांत तयार केली जाते. त्याची पद्धत जाणून घेऊया.

१. दोन पिकलेले आंबे घ्या. त्यांना धुवून घ्या. त्यानंतर त्याच्या मोठ्या फोडी कापून घ्या.

२. त्यानंतर आंब्याच्या फोडी किसून घेऊन त्याच्या प्यूरी करा.

३. त्यांनतर त्या जारमध्ये एक चिमूटभर मीठ, मलाई किंवा फ्रेश क्रिम, आटवलेले दूध, दूध पावडर आणि इलायची पावडर टाकून व्यवस्थित ब्लेंड करून घ्या.

step 2

step 2

४. त्यानंतर मँगो कुल्पीच्या मिश्रणाला एखाद्या पेपर कपमध्ये किंवा स्टीलच्या ग्लासमध्ये ठेवा. त्यानंतर वरून आंब्याच्या लहान तुकड्यांनी त्याला गार्निश करा. नंतर पेपर फाईलने त्याचे तोंड बंद करून मधे आइसक्रिम स्टिक सेट करा.

५. जवळपास ५ ते ६ तास ते फ्रिजमध्ये ठेवा.

step 3

step 3

६. जेंव्हा ती कुल्पी सेट होईल तेंव्हा त्याला त्या साच्यातून बाहेर काढा आणि मस्त आंब्याच्या कुल्पीचा आस्वाद घ्या.

final mango kulfi

final mango kulfi

मस्त मँगो कुल्पीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता.

Web Title: Food Recipe In Marathi Make Homemade Mango Kulpi Learn The

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :mango kulfifood recipe