पोहे डोसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोहे डोसे

पोहे डोसे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साहित्य : २ भांडी (ग्लास) तांदूळ, अर्धे भांडे जाड पोहे, १ चमचा मेथी, मीठ, दही

कृती :

प्रथम ६-७ तास तांदूळ भिजत घालावेत. अर्धे भांडे पोहेही भिजवून ठेवावेत. १ चमचा मेथी भिजत घालावी. मिक्सरवर भिजलेले तांदूळ, मेथी, पोहे थोडे पाणी घालून वाटून घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ व १ टेबलस्पून दही घालावे, दही आंबट नसल्यास २ चमचे घालावे. पीठ १०-१२ तास आंबवावे. पीठ चांगले फुगून वर आले, की डोसे करावे.

चटणी किंवा बटाटा भाजीबरोबर खावे. स्पंजप्रमाणे जाळीदार, लुसलुशीत डोसे बनतात. यास ‘स्पंज डोसा’ही म्हणतात.

- माधुरी पाटणकर, पुणे

loading image
go to top